कुठे आहे तुकडे तुकडे गॅंग?

कुठे आहे तुकडे तुकडे गॅंग?

भारतामध्ये 'तुकडे-तुकडे गँग' सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे. कार्य

पवारांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
शेतीची पार्श्वभूमी असलेले खासदार आंदोलनावर गप्प का?
दलित कार्यकर्ता हत्येच्या मुद्द्यावरून मेवानींचे निलंबन

भारतामध्ये ‘तुकडे-तुकडे गँग’ सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहे.
कार्यकर्ते साकेत गोखले यांनी 26 डिसेंबरला केंद्रीय गृह मंत्रालयाकडे माहिती अधिकारांमध्ये देशांमध्ये तुकडे तुकडे गॅंग अस्तित्वात कुठे आहे अशी माहिती विचारली होती. माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या या प्रश्नावर गृह मंत्रालयाने उत्तर दिले आहे.
द वायर मराठीने यासंदर्भात 27 डिसेंबरला एक बातमी प्रसिद्ध केली होती. तुकडे तुकडे गँग नेमकी कोणती गँग आहे? त्याची नेमकी माहिती द्यावी, असा अर्जच माहितीच्या अधिकारामध्ये मुंबईतील कार्यकर्ते साकेत गोखले, यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केला होता.
‘टुकडे-टुकडे गँग’ देशातील अशांततेला जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या अनुशंगानेच गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.
दिल्ली विकास प्राधिकरणा(डीडीए)तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शहा म्हणाले होते, की दिल्लीत अशांतता आणि हिंसा पसरविण्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली तुकडे तुकडे गँग जबाबदार आहे. आता वेळ आली आहे, की दिल्लीतील जनतेने त्याना शिक्षा दिली पाहिजे.
वादग्रस्त नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहे. या कायद्यावर संसदेमध्ये चर्चा झाली, पण त्यावेळी कोणताही पक्ष काहीच बोलले नाही, पण ते बाहेर येऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला होता.
त्यानंतर संध्याकाळी गोखले यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागविणारा अर्ज होता.
तुकडे तुकडे गँग कशी ओळखता येते. या तुकडे तुकडे गँगवर कारवाई करण्यासाठी काही ठरलेली प्रक्रिया आहे का. गृहमंत्र्यांनी मारलेले शेरे, हे पोलीस अथवा संबंधीत यंत्रणेच्या माहितीवर आधारीत आहेत का. नेमक्या कोणत्या कायद्यान्वये मंत्री तुकडे तुकडे गँगला शिक्षा करणार आहेत, असे प्रश्न गोखले यांनी केलेल्या अर्जामध्ये विचारले होते.
गृह मंत्रालयाच्या उत्तरानंतर साकेत गोखले म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाबाबत ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. जाहीर सभेत ‘टुकडे-टुकडे गँग’ हा शब्दप्रयोग का केला, हे अमित शहा यांनी सांगायला हवे. अन्यथा जनतेशी खोटे बोलले व जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांनी जाहीरपणे माफी मागायला हवी, अशी मागणी गोखले यांनी केली.
गुजरातमध्ये निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान गुजरातमधील निवडणुकीत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही गोखले यांनी माहिती अधिकारात त्या आरोपाला पुष्टी देणारी कोणती माहिती आहे, याची माहिती मागवली होती. त्यावर अनौपचारिक माहितीवर आधारीत आरोप असल्याचे उत्तर त्याना मिळाले होते. नंतर अरुण जेटली यांनी या विषयावर संसदेमध्ये माफी मागितली होती.–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0