तेलंगणातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे ‘डिजिटल विषमता’?

तेलंगणातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे ‘डिजिटल विषमता’?

ऑनलाइन अध्ययनासाठी आवश्यक साधने नसल्याचे कारण देत तेलंगणमधील एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी झाली. मात्र, या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे एवढे एकच कारण नाही, असा दावा तिचे कुटुंबीय तसेच मित्रमंडळी करत आहेत.

ऑनलाइन अध्ययनासाठी आवश्यक साधने नसल्याचे कारण देत तेलंगणमधील एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी झाली. मात्र, या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे एवढे एकच कारण नाही, असा दावा तिचे कुटुंबीय तसेच मित्रमंडळी करत आहेत.

लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीवर गणित विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीचे नाव ऐश्वर्या रेड्डी असे होते. आपल्या शिक्षणाचा कुटुंबावर मोठा आर्थिक बोजा येत आहे आणि शिक्षणाशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे आयुष्य संपवत आहोत, असे ऐश्वर्याने ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून ती कुटुंबासमवेत तेलंगणमध्ये राहत होती. ऐश्वर्याचे आई-वडील रोजंदारी कामगार आहेत आणि कोविडच्या साथीचा परिणाम म्हणून आलेल्या आर्थिक ताणामुळे त्यांना पोट भरण्यासाठी खूप कष्ट करावे लागत आहेत. गेल्या वर्षी ऐश्वर्याला कॉलेजमध्ये घालण्यासाठी त्यांना घर गहाण ठेवावे लागले. ऐश्वर्याच्या धाकट्या बहिणीलाही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे.

दोनेक महिन्यांपूर्वी एलएसआर प्रशासनाने ३१ ऑक्टोबरपर्यंत वसतिगृहे रिकामी करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. गेल्या वर्षीही वसतिगृह केवळ पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने केला होता आणि विद्यार्थ्यांनी त्यावेळी या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

वसतिगृहाबद्दलची अधिसूचना आल्यापासून ऐश्वर्या चिंतेत होती, असे तिच्या आईने स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले. कॉलेजच्या आसपासच्या परिसरात राहण्याचा खर्च मासिक १२,०००-१८,००० रुपये असल्याने आपल्याला वसतिगृहात राहू द्यावे अशी विनंती ऐश्वर्याने वॉर्डनला केली होती. मात्र, तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे तिच्या मित्रमंडळींचे म्हणणे आहे.

ऐश्वर्याला ऑनलाइन वर्ग करणेही खूप कठीण जात होते, कारण, तिच्याकडे लॅपटॉप नाही आणि तिला तिच्या फोनचा वापर करावा लागत होता. तिला दररोज आठ तासांच्या वर्गापैकी तीनच तास करता येत होते, असे एलएसआर विद्यार्थी संघटनांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शिवाय तिच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शनही नव्हते. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून तिला या सर्व आघाड्यांवर लढावे लागत होते. कॉलेजमधील प्राध्यापक उपस्थितीची नोंद ठेवत होते. १ नोव्हेंबरपासून त्यांनी उपस्थिती ऐच्छिक केली,” असे ऐश्वर्याच्या एका बॅचमेटने सांगितले.

वसतिगृहाची कडक धोरणे, ऑनलाइन वर्गांमधील मर्यादा आणि कुटुंबाची नाजूक आर्थिक परिस्थिती यांहून अधिक महत्त्वाची समस्या म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे जाहीर शिष्यवृत्तीपैकी एक पैसाही तिला मिळाला नव्हता. भारत सरकार आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करत असलेली इन्स्पायर शिष्यवृत्ती तिला जाहीर झाली होती.

प्रशासनाचा प्रतिसाद

प्रशासनाने ऐश्वर्याच्या मृत्यूनंतर सुमारे आठवडाभराने ८ नोव्हेंबरला नोटिस काढली. ऐश्वर्याने कधीही तिचा विभाग, प्रशासन, प्राचार्य किंवा प्राध्यापकांशी संपर्क साधला नव्हता, असे या नोटिशीत म्हटले होते. मात्र, हे सत्य नाही, असा आरोप तिच्या मित्रमंडळींनी तसेच सहाध्यायींनी केला आहे. आम्ही अनेकदा प्राचार्य, कर्मचाऱ्यांशी संपर्क करून कोविड साथीच्या काळात डिजिटल साधनांच्या उपलब्धतेवरून पडलेल्या दुहीची माहिती दिली होती. मात्र, प्रशासनाने एकदाही प्रतिसाद दिला नाही, असे एका विद्यार्थ्याने सांगितले. ऐश्वर्याच्या मृत्यू धक्कादायक असल्याचे अनेकांनी सांगितले तसेच संतापही व्यक्त केला. प्राचार्यांकडून अशा प्रकारची कोरडी वर्तणूक अपेक्षित नाही. त्यांनी ऐश्वर्याच्या मृत्यूला आठवडा उलटल्यानंतर नोटिस का काढली, असा प्रश्नही एका विद्यार्थ्याने उपस्थित केला.

दरम्यान, अनेक विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या मृत्यूप्रकरण विरोध व्यक्त केला. शिष्यवृत्तीचे पैसे दिले जावेत या मागणीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. एलएसआरमधील अनेक विद्यार्थ्यांनी निषेध म्हणून वर्गांवर बहिष्कार घातला. गेले दोन दिवस ऐश्वर्याच्या आत्महत्येबद्दल ट्विटरवरही मोठे वादळ उठले आहे.

मूळ बातमी

COMMENTS