पटेलांच्या एका लक्षद्वीप दौऱ्यावर २३ लाखांचा खर्च

पटेलांच्या एका लक्षद्वीप दौऱ्यावर २३ लाखांचा खर्च

कोचीः लक्षद्वीपचे प्रशासन उपराज्यपाल प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यासाठी दरवेळी लाखो रुपये खर्चास मंजुरी देत आहे. द हिंदूने दिलेल्या व

समलिंगी विवाह : धर्माचा न्याय, न्यायाचा धर्म
सेंट्रल व्हिस्टा : हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार
तुरूंग अधिकाऱ्यांनी गौतम नवलखा यांचा चष्मा नाकारला

कोचीः लक्षद्वीपचे प्रशासन उपराज्यपाल प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यासाठी दरवेळी लाखो रुपये खर्चास मंजुरी देत आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या सोमवारी पटेल लक्षद्वीपमधील अगत्ती येथे आले होते व त्यासाठी त्यांनी दमणहून तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान वापरले होते. या प्रवासावर लाखो रुपये खर्च झाला आहे. या खर्चाची आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही.

पण २१ फेब्रुवारीला तटरक्षक दलाच्याच डॉर्नियर विमानातून पटेल व तीन अधिकार्यांनी प्रवास केला होता. हा प्रवास दमण-अगत्ती-दमण असा होता. या प्रवासावर लक्षद्वीप प्रशासनाने सरकारी तिजोरीतील २३ लाख २१ हजार २८० रुपये खर्च केले. संरक्षण खात्याने या प्रवासाचे बिल जाहीर केल्याने ही बाब उघडकीस आली आहे.

लक्षद्वीपच्या उपराज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पटेल यांनी तेथे दारुबंदी उठवली असून बीफबंदी राबवण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. त्यावर या प्रदेशात जनमतामध्ये असंतोष उफाळला असून पटेल यांना पुन्हा बोलावून घ्यावे अशी मागणी भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी सरकारला केली आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांचे लक्षद्वीपचे दौरे सरकारी तिजोरीवर बोजा होऊ लागले आहे.

गेला आठवडाभर लक्षद्वीपमध्ये पटेल यांच्याविरोधात अनेक निदर्शने सुरू आहेत. लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांनीही निदर्शने केली असून पटेल यांचे निर्णय लक्षद्वीपच्या संस्कृती व परंपरेवर हल्ले असल्याचे आरोप त्यांनी सोशल मीडियात केले आहेत. खुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात निदर्शने केली आहेत.

लक्षद्वीपच्या नजीक असलेल्या केरळमध्येही पटेल यांच्याविरोधात जनमत उभे राहिले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: