राम जन्मभूमी ट्रस्ट, भाजप आमदाराविरोधात महंताची तक्रार

राम जन्मभूमी ट्रस्ट, भाजप आमदाराविरोधात महंताची तक्रार

अयोध्याः श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सदस्य, भाजपचे आमदार, अयोध्येचे महापौर व एका सरकारी अधिकार्याविरोधात सरकारी जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याच

१२ भाजप आमदारांचे दीर्घ निलंबन घटनाबाह्य
काश्मीरमधील परिस्थिती : अमित शहांच्या गृहमंत्रालयाकडे माहिती नाही
नागरिकत्व कायदा : स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अयोध्याः श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सदस्य, भाजपचे आमदार, अयोध्येचे महापौर व एका सरकारी अधिकार्याविरोधात सरकारी जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार हनुमानगढी मंदिराचे महंत धर्म दास यांनी पोलिसांत केली आहे. या सर्व मंडळींनी राम जन्मभूमीचा निधी गोळा करून भ्रष्टाचार केला असून जनतेची फसवणूक केल्याचा आरोप धर्म दास यांनी केला आहे. धर्म दास यांनी ट्रस्टचे एक सदस्य चंपत राय यांना लगेच बरखास्त करावे अशीही मागणी केली आहे.

अयोध्येतील मंदिराची जबाबदारी संतांकडे द्यावी, सरकारचे काम देश चालवणे असून मंदिर नाही, असेही धर्म दास यांचे म्हणणे आहे. धर्म दास यांनी या संदर्भातील एक व्हीडिओ पत्रकारांना दिला आहे.

धर्म दास यांनी तक्रार केलेल्यांमध्ये भाजपचे गोसाईगंज येथील आमदार इंद्र प्रताप तिवारी, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय, त्यांचे भाचे दीप नारायण उपाध्याय व फैजाबादचे उप-रजिस्ट्रार एस. बी. सिंह यांची नावे आहेत.

धर्म दास यांच्या मते दीप नारायण उपाध्याय यांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये महंत देवेंद्र प्रसादाचार्य यांच्याकडून ६७६ चौ. मी. जमीन २० लाख रु.ला खरेदी केली. त्यानंतर ही जमीन मंदिर ट्रस्टला २.५ कोटी रु.ना विकली. त्यावेळी जमिनीचा भाव ३५ लाख रु. होता. या सौद्यात भाजपचे आमदार इंद्र प्रताप तिवारी व ट्रस्टचे एक सदस्य अनिल मिश्रा साक्षीदार म्हणून उपस्थित होते.

धर्म दास यांच्या या तक्रारीबाबत ट्रस्टच्या सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी या जमीन खरेदीची तक्रार सरकारी अधिकार्यांकडे करायला हवी होती, असे मत व्यक्त केले. पोलिसांकडे तक्रार करण्यास काहीच अर्थ नसून गुप्ता यांनी या खरेदी प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असे स्पष्ट केले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तक्रारदार धर्म दास हे राम मंदिर निर्माण आंदोलनाशी संबंधित दिवंगत महंत राम अभिराम दास यांचे शिष्य आहेत. राम अभिराम दास हे राम मंदिर आंदोलनात सक्रीय होते. बाबरी मशीद-राम मंदिर खटल्यात ते हिंदू पक्षकारांपैकी एक होते.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0