‘विक्रम’चा पत्ता लागला : इस्रो

‘विक्रम’चा पत्ता लागला : इस्रो

बंगळुरू : पृथ्वीशी संपर्क तुटलेल्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून ऑर्बिटरने विक्रमची थर्मल छायाचित्रे टिपल्याची माहिती इस्राचे प्रमुख के. सिवन यांनी रविवारी दिली. ‘विक्रम’ वेगाने चंद्रावर उतरल्याने त्याच्याकडून संदेश येत नाही या प्रश्नाचे उत्तर अद्याप आपल्याकडे नाही पण ऑर्बिटरने विक्रम लँडरची छायाचित्रे घेतली आहेत, असे त्यांनी सांगितले.

विक्रमशी संपर्क साधण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून त्याविषयी लवकरच माहिती दिली जाईल पण आताच त्याविषयी माहिती देणे घाईचे होईल असेही सिवन यांनी स्पष्ट केले.

शनिवारी पहाटे पावणे दोनच्या आसपास चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किमी अंतरावर विक्रमचा संपर्क तुटला. अनेक प्रयत्न करूनही विक्रमशी संपर्क साधला जात नसल्याने देशभर नाराजी उमटली होती.

COMMENTS