नवी दिल्लीः सद्य काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रसार माध्यमांतून होणाऱ्या टिकेवर बुधवारी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली. आ
नवी दिल्लीः सद्य काळात सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रसार माध्यमांतून होणाऱ्या टिकेवर बुधवारी न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला थोडी सुटका द्या, न्यायमूर्तींवर टीका करण्याला काही तरी सीमा ठेवा असा त्रागा न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केला. ख्रिश्चन संस्था व धर्मगुरुंवर वाढत हल्ल्यांसंदर्भात एक याचिका तातडीने सुनावणीसाठी घ्यावी यासाठी एक वकील न्यायालयाला विनंती करत होते, त्यावेळी न्या. चंद्रचूड म्हणाले की, ख्रिश्चन संस्था व धर्मगुरुंवर वाढत्या हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून विलंब होत असल्याची वृत्ते प्रसार माध्यमात येत होती. पण वस्तूस्थिती तशी नाही. गेल्या वेळी जेव्हा ही याचिका सुनावणीसाठी घेण्याचे ठरवले तेव्हा आपल्याला कोविड-१९ची लागण झाली होती, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. अशी वृत्ते पसरून न्यायाधीशांवरचे हल्ले प्रसार माध्यमांनी बंद करावेत, टीकेला काही तरी सीमा ठेवावी, आपल्याला अशा बातम्या कोण पुरवतात, असा सवाल न्या. चंद्रचूड यांनी केला.
त्यानंतर अन्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी या याचिका सुनावणीसाठी घेतल्या असून अन्यथा याचीही बातमी प्रसिद्ध झाली असती, असा टोला मारला.
लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही महिन्यात देशातल्या ख्रिश्चन संस्था व धर्मगुरुंवर ४५ ते ५० गंभीर स्वरुपाचे हल्ले झाले असून न्यायालयाने त्या संदर्भात संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत अशी याचिका बंगळुरुचे आर्चबिशप डॉ. पीटर मचाडो, द नॅशनल सॉलिडॅरिटी फोरम व इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया या संस्थेकडून एप्रिलमध्ये दाखल केली होती. या याचिकेत तहसीन पुनावाला खटल्याचा आधार घेत तपास यंत्रणांना निर्देश द्यावेत, धार्मिक विद्वेषातून होणारे हल्ले व त्यासंदर्भात दाखल करण्यात येणाऱ्या फिर्यादी यांच्यावर देखरेख ठेवणारा नोडल अधिकारी नेमावा अशी मागणी करण्यात आली होती. पण या याचिकेवरची सुनावणी रखडली होती.
गेल्या महिन्याच्या अखेरीस न्यायालयाने ११ जुलैला याचिका सुनावणीसाठी घेतल्या जातील, असे सांगितले होते. नंतर सुनावणी १५ जुलैला ढकलण्यात आली. याच काळात न्या. चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाल्याने याचिकांवरची सुनावणी लांबणीवर पडली होती.
मूळ बातमी
COMMENTS