कर्नाटकाच्या सत्तांतरातही ‘पीगॅसस’ची घुसखोरी

कर्नाटकाच्या सत्तांतरातही ‘पीगॅसस’ची घुसखोरी

नवी दिल्लीः कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांचे झालेले बंड व त्यातून भाजपने मिळवलेली सत्ता या दरम्यानच्या राजकीय घडामोडीत तत्कालिन उपमुख्यमंत्री जी. परमे

राफेल घोटाळाः दलालीसाठी बनावट बिले; सीबीआयचे दुर्लक्ष
बायडेन यांच्या भेटीची शक्यता इराणने फेटाळली
नांदेड स्फोटात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका – माजी संघ स्वयंसेवकाचा दावा

नवी दिल्लीः कर्नाटकात काँग्रेसच्या आमदारांचे झालेले बंड व त्यातून भाजपने मिळवलेली सत्ता या दरम्यानच्या राजकीय घडामोडीत तत्कालिन उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर व मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी व माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या खासगी सचिवांचे मोबाइल क्रमांक इस्रायलची कंपनी एनएसओकडून हॅकिंगसाठी निश्चित केल्याचा डेटाबेस उघडकीस आला आहे.

हे मोबाइल क्रमांक फॉरबिडन स्टोरीज या ना नफा तत्वावर चालणार्या फ्रान्सस्थित वृत्तसंस्थेने जारी केलेल्या डेटाबेसमध्ये आढळून आले आहेत. हा डेटाबेस द वायरसह जगभरातील अन्य १६ वृत्तसंस्थांनी गोळा केला आहे.

या डेटाबेसनुसार २०१९मध्ये कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचे युती सरकार काँग्रेस व जेडीएसमधील काही आमदारांच्या बंडखोरीमुळे पडले होते. या आमदारांच्या बंडखोरीला भाजपचा आशीर्वाद होता. या १७ बंडखोरांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत जेडीएस-काँग्रेस सरकारला खाली खेचले होते. व नंतर हे सर्व आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.

योगायोग असा की, याच काळात काँग्रेसचे नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला फोन हॅक होतोय म्हणून आपला क्रमांक बदलून नवा  क्रमांक घेतला होता. हा क्रमांकही एनएसओच्या संभाव्य यादीत मिळाला आहे.

द वायरद्वारे उघडकीस आणल्या गेलेल्या डेटा विश्लेषणामध्ये असे आढळून आले आहे की, २०१९मध्ये कुमारस्वामी यांचे खासगी सचिव सतीश यांच्याशी निगडित दोन मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते. याच काळात बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेस-जेडीएसकडून सुरू होते. याच कालावधीत सिद्धरामैय्या यांचे खासगी सचिव वेंकटेश यांचा मोबाइल क्रमांकही हँकिंगसाठी निश्चित करण्यात आला होता. सिद्धरामैय्या अनेक वर्ष कोणताही मोबाइल वापरत नसल्याचे दिसून आले. ते आपले सर्व संभाषण आपल्या निकटवर्तीयांच्या फोनद्वारे करत असल्याने वेंकटेश यांचा क्रमांक एनएसओच्या यादीत आल्याने त्याला महत्त्व प्राप्त होते.

या संदर्भात २७ वर्षे सिद्धरामैय्या यांच्यासोबत काम करणारे वेंकटेश यांनी द वायरशी बोलताना डेटाबेसमधील मोबाइल क्रमांक आपलाच आहे, असे कबूल केले. त्यांनी आपल्यावर पाळत ठेवण्याविषयी चिंता व्यक्त केली. पण त्यांनी आपल्या मोबाइलची फॉरेन्सिक चाचणी करण्यास तयारी दर्शवली नाही. वेंकटेश यांचा क्रमांक २०१९मध्ये निश्चित करण्यात आला होता.

याच प्रकारे त्या काळात काँग्रेसचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांचा क्रमांकही पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. द वायरने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी २०१९मध्ये आपण याच क्रमांकाचा फोन वापरत होतो याची कबुली दिली. नंतर त्यांनी काही महिने आपला क्रमांक वापरणे बंद केले होते.

परमेश्वर यांनी पेगॅसस स्पायवेअरसंबंधित आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आपला क्रमांक पाळत ठेवण्यासाठी का निश्चित केला यामागचे कारण आपल्याला समजू शकले नाही, असेही ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0