नवी दिल्ली : कोरोना महासाथीचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन पुकारला असला तरी विविध राज्यात अडकून पडलेले लाखो स्थलांतरित मजूर,
नवी दिल्ली : कोरोना महासाथीचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन पुकारला असला तरी विविध राज्यात अडकून पडलेले लाखो स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविकांना आपल्या राज्यात परत जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण यासाठी राज्यांची सहमतीची आवश्यकता असून दुसर्या राज्यात जाण्यासाठी केवळ बसचाच वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
या बसेसचे पूर्ण सॅनिटायझेशन करून बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिर्वाय आहे. एकदा राज्यात पोहचल्यानंतर प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येईल व प्रत्येकाला क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल, व त्या संदर्भातील आरोग्य तपासणी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. .
केंद्राच्या या निर्णयामुळे अनेक राज्यात अडकलेल्यांना दिलासा मिळाला असून परप्रांतीयांना प्रवास सुकर होण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नोडल अधिकार्यांची नेमणूक करावी लागणार आहे. हे नोडल अधिकारी अडकलेल्या नागरिकांची नोंद ठेवणार आहे. जेव्हा नागरिक त्यांच्या राज्यात पोहचेल तेव्हा त्याची पुन्हा नोंद ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अडकलेला एक मोठा समूह एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणार असेल तर त्या दोन राज्यांमध्ये रस्त्याचा वापर करण्याबाबत सहमती आवश्यक असणार आहे.
COMMENTS