लॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना

लॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना

लंडन : ज्या देशांमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमजोर किंवा अत्यंत खराब आहे, अशा देशांनी लॉक डाऊन जरी केले तरी हा उपाय अपुरा असून लॉक डाऊननंतर पुन्हा

कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत
घाई करू नका, सर्वांना लस मिळेल – उद्धव ठाकरे
राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

लंडन : ज्या देशांमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमजोर किंवा अत्यंत खराब आहे, अशा देशांनी लॉक डाऊन जरी केले तरी हा उपाय अपुरा असून लॉक डाऊननंतर पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यासाठी अशा देशांनी त्यांची सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक कार्यक्षम व तंदुरुस्त करण्यावर भर दिला पाहिजे असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकालिन व्यवस्थेचे विशेषज्ञ माइक रेयान यांनी मांडले आहे.

ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, अशा रुग्णांना शोधणे, त्यांचे विलगीकरण करणे हे या घडीला अत्यंत महत्त्वाचे काम असून जर आपली आरोग्य व्यवस्था खराब असेल तर लॉक डाऊन नंतर कोरोनाचा धोका अधिक वाढेल व त्याची साथ पसरेल अशी भीती त्यांनी रेयान यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे केंद्र आशिया खंड असल्याचे म्हटले होते पण सिंगापूर व द. कोरियातील आरोग्य व्यवस्थांचे मॉडेल हे युरोपसाठी महत्त्वाचे ठरले आहे. या विषाणूचा प्रसार एकदा रोखल्यास त्याच्याविरोधात मोठी लढाई लढावी लागेल, याकडे रेयान यांनी लक्ष वेधले आहे.

रेयान यांनी कोरोना विषाणूवरील अनेक लशींचे उत्पादन सुरू असल्याचे सांगितले पण या लशींपैकी केवळ एका लसीची चाचणी अमेरिकेत सुरू असल्याचे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0