बस गैरव्यवहारात गडकरी कुटुंबिय : स्वीडिश मीडियाचे वृत्त

बस गैरव्यवहारात गडकरी कुटुंबिय : स्वीडिश मीडियाचे वृत्त

नवी दिल्लीः नागपूरमधील बस खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने स्वीडनमधील बसनिर्मिती कंपनी ‘स्कॅनिया’ व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाची एक

कोरोनाबाधित बहुतांश नेते खासगी रुग्णालयात
माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय
पुणे,पिंपरीत सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी

नवी दिल्लीः नागपूरमधील बस खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने स्वीडनमधील बसनिर्मिती कंपनी ‘स्कॅनिया’ व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाची एक कंपनी यांच्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे वृत्त स्वीडनमधील एसव्हीटी (SVT) या वृत्तसंस्थेने दिले आहे. हा आर्थिक गैरव्यवहार स्कॅनिया कंपनीला त्यांच्या अंतर्गत चौकशीत आढळून आला व त्याची चौकशी त्यांनी सुरू केली होती. हा गैरव्यवहार कायदेशीर भाषेत कामाच्या बदल्यात लाच किंवा अन्य कामाची पूर्ती करणे (Quid Pro Quid) असा होतो.

‘स्कॅनिया’ने २०१३ ते २०१६ या काळात आपल्या कंपनीच्या बस भारतात विकण्यासाठी लाच दिली होती आणि या बस देशातल्या ७ राज्यात विकल्या होत्या, असे एसव्हीटीचे म्हणणे आहे. या कंपनीचे भारतातील कामकाज २००७मध्ये सुरू झाले व २०११मध्ये कंपनीने आपल्या बसनिर्मितीचा कारखाना देशात उभा केला होता.

हे प्रकरण लक्षात आले २०१७मध्ये. या वर्षी स्कॅनिया कंपनीच्या ऑडिटरना आपल्या कंपनीने एका कामाच्या मोबदल्यात भारतातील एका परिवहन मंत्र्याला अपेक्षित असलेली एक लक्झरी बस भेट दिल्याची माहिती मिळाली. ही माहिती ‘स्कॅनिया’ने त्यांची मूळ मालकी असलेल्या जर्मन वाहननिर्मिती कंपनी ‘फोक्सवॅगन’ यांना कळवली व हे वृत्त नंतर स्वीडनच्या एसव्हीटी या वृत्तवाहिनीने अन्य एक जर्मन वृत्तसंस्था झेडीएफने (ZDF)प्रसिद्ध केले. द वायरने या वृत्ताची पूर्ण शहानिशा केलेली नाही.

लक्झरी बसचा तपशील

एसव्हीटीने दिलेल्या वृत्तानुसार २०१६ या वर्षाच्या अखेरीस एक लक्झरी बस स्कॅनिया कंपनीच्या एका खासगी डिलर वा रिसेलरकडून गडकरी यांच्या मुलाच्या संबंधित कंपनीला देण्यात आली. या व्यवहाराच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीच्या काही बस भाडेतत्वावर वा विकत घेतल्या गेल्या.

एसव्हीटीमध्ये आलेला कोलाज.

एसव्हीटीमध्ये आलेला कोलाज.

ही बस गडकरी यांच्या मुलीच्या लग्नात वापरण्यात आली होती. पण असे आरोप मीडियाच्या केवळ कल्पना असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाचे म्हणणे आहे. २०१६मध्ये गडकरी यांच्या मुलीचे लग्न अत्यंत गाजावाजा करत मोठ्या थाटामाटात झाले होते. या लग्नाला बड्या निमंत्रितांना लग्नस्थळी आणण्यासाठी ५० चार्टर्ड विमाने भाड्याने घेतली होती, असे वृत्त आले होते. पण हेही आरोप तथ्यहीन असल्याचे गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

स्कॅनिया कंपनीचा आर्थिक व्यवहार हा फोक्सवॅगनच्या वित्तीय कंपनीकडून हाताळला जातो, असे एसव्हीटीचे म्हणणे आहे. या अहवालात स्कॅनियाच्या सीईओनी गडकरी यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या बसची किंमत फोक्सवॅगनला चुकती केली असल्याचे म्हटले आहे. पण या बससंदर्भातील आर्थिक व्यवहार व त्याची मूळ मालकी यांच्या संदर्भात अद्याप स्पष्टता नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले होते. एसव्हीटी व झेडडीएफने या व्यवहाराबद्दल स्कॅनियाला विचारले असता त्यांनी या बसचा सध्याचा मालक कोण आहे, याबद्दल सांगण्यास असमर्थता व्यक्त केली.

गडकरी यांनी आरोप फेटाळले

या संदर्भात द वायरने गडकरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता गडकरी यांच्या कार्यालयाने अशी कोणतीही बस गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला मिळाली नसून हे वृत्त अत्यंत खोडसाळ, दिशाभूल व हेतूपुरस्सर उभे केल्याचा दावा केला. गडकरी वा त्यांच्या कुटुंबियांचा या बसच्या खरेदीबाबत कोणताही संबंध नाही. त्याचबरोबर बस खरेदी वा विक्रीबाबत कोणत्याही फर्मशी वा व्यक्तीशी गडकरी वा त्यांच्या कुटुंबियांचे संबंध नाही, असे पत्रक गडकरी यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले.

पर्यावरणस्नेही इथॅनॉलवर चालणारी स्कॅनिया कंपनीची बस नागपूरमध्ये आणण्याचे श्रेय गडकरी यांचे आहे. त्यांनी नागपूर महापालिकेला या संदर्भात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यास सांगितले होते, त्यानुसार महापालिका व स्कॅनिया यांच्यात एमओयू झाला व शहरात या बस वाहतूक व्यवस्थेत सामील झाल्या. त्या खरेदीचा गडकरी यांचा कोणताही संबंध नाही, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण स्कॅनिया कंपनीचा अंतर्गत मामला असून त्यांचे स्पष्टीकरण येईपर्यंत प्रसार माध्यमांनी वाट पाहावी असेही पत्रकात म्हटले आहे.

चौकशीत पोलिसांचा समावेश नाही

स्कॅनियाच्या अंतर्गत चौकशीत भारतीय अधिकार्यांना बसविक्री व्यवहारात लाच देण्यात आली असे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पण २०१७मध्ये स्कॅनियाने पुन्हा अंतर्गत चौकशी केली असता कंपनीतील काही कर्मचारी व वरिष्ठ व्यवस्थापनातील काही अधिकारी यांच्यामार्फत गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते, अशी प्रतिक्रिया रॉयटरला १० मार्च २०२१ ला देण्यात आली आहे.  हा गैरव्यवहार लाच व्यवहार, व्यवसाय भागीदारामार्फत गैरव्यवहार यात मोडतो असे या अधिकार्याचे म्हणणे आहे. मात्र स्कॅनिया कंपनीच्या अंतर्गत चौकशी पोलिस सामील नव्हते आणि कुणाची चौकशी करावी एवढे पुरावे सबळ नव्हते असेही या अधिकार्याने म्हटले आहे.

भारताला बसविक्री बंद

दरम्यान रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार स्कॅनियाने भारतीय बाजारपेठेला बस विकणे बंद केले असून भारतातील कंपनीतील उत्पादनही बंद केल्याचे समजते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0