नागपूर : झुंडबळी (मॉब लिंचिंग) हा पाश्चिमात्य प्रकार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करणारा हा कट असल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजया
नागपूर : झुंडबळी (मॉब लिंचिंग) हा पाश्चिमात्य प्रकार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करणारा हा कट असल्याचा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केला. लिंचिंग (झुंडबळी) या शब्दाची उत्पत्ती भारतीय नाही ती भारतीयांवर थोपवू नका. लिंचिंग हा पाश्चिमात्य प्रकार असून भारताचा संदर्भ देऊन या देशाला बदनाम करू नका असे ते म्हणाले.
देशात हिंसेच्या अनेक घटना घडत असतात व त्याची वृत्ते येत असतात. एका समुदाय दुसऱ्या समुदायाशी भिडला. एका समुदायातील व्यक्तीला दुसऱ्या समुदायातील जमावाने धरून मारहाण केली, त्याला ठार मारले, किंवा हल्ला केला, अशी वृत्ते येत असली तरी त्यात फारसे तथ्य नसते. १००० घटना असतील तर त्यातील केवळ तीनचार घटनांच खऱ्या घडलेल्या असतात. एखाद्या समुदायाला त्यावरून दोषी धरण्यात येते. हे प्रकार दोन समुदायांमध्ये संघर्ष व्हावे म्हणून केले जातात. त्यामध्ये संघाचे नाव घेऊ नये असे ते भागवत म्हणाले.
संघाचे स्वयंसेवक अशा कोणत्याही घटनांमध्ये सामील नसतात, त्यांचा संबंधही नसतो. उलट स्वयंसेवक असे प्रसंग होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. एखादा स्वयंसेवक त्यात गुंतला असेल तर त्याला वाचवायचे प्रयत्नही संघ करत नाही. संघ उलट त्या व्यक्तीला कायद्याच्या मार्गाने स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध कर असे सांगतो, असे भागवत म्हणाले.
लिंचिंग भारतात कधीही झालेले नाही. असे शब्द बाहेरून येतात. प्राचीन काळी परदेशात एक धर्मग्रंथ तयार झाला होता. त्यात अशा घटनांचा उल्लेख आहे. एका गावात एका महिलेची ग्रामस्थांकडून दगडाने ठेचून हत्या केली जाते. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जातात. तेव्हा ग्रामस्थ म्हणतात ती महिला पापी होती म्हणून तिला मारण्यात आले. तेव्हा येशू म्हणतात, असा कोणता व्यक्ती आहे ज्याने पाप केलेले नाही? त्याला दगड उचलून ठार मारण्याचा अधिकार नाही. हे शब्द तेथून आले आहेत, असे भागवत म्हणाले.
भागवत यांनी मोदी-शहा यांचे ३७० कलम रद्द केल्याबद्दल अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एचसीएलचे शिव नाडर उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
मूळ बातमी
COMMENTS