भोपाळः मध्य प्रदेशमधील कमल नाथ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले काँग्रेसचे सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे योगदान होते, अ
भोपाळः मध्य प्रदेशमधील कमल नाथ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले काँग्रेसचे सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे योगदान होते, असे वक्तव्य भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूर येथील एका शेतकरी संमेलनात केले.
कैलाश विजयवर्गीय इंदूर येथून सहा वेळा निवडणूक जिंकून आले आहेत. या मतदारसंघात शेतकरी संमेलनात बोलताना विजयवर्गीय म्हणाले, तुम्हाला पडद्यामागची एक गोष्ट सांगतो जी तुम्ही कुणाला सांगू नका. मी गोष्ट आजपर्यंत मी कुणाला सांगितली नाही. पण या मंचावरून पहिल्यांदा सांगतो की, कमल नाथ यांचे सरकार पाडण्यात ज्या कोणाचे महत्त्वाचे योगदान असेल तर ते धर्मेंद्र प्रधान यांचे नव्हे तर नरेंद्र मोदीजी यांचे आहे.
यावेळी मंचावर धर्मेंद्र प्रधानही होते. धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय मंत्री आहेत.
गेल्या मार्चमध्ये काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून आपल्या गटातल्या २२ आमदारांना राजीनामा द्यायला लावला होता व कमल नाथ सरकार पडले होते. त्यानंतर भाजपचे सरकार सत्तेवर आले होते.
मूळ बातमी
COMMENTS