‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’

‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’

मुंबईः महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी भाजपशी निगडित असलेल्या एका एजन्सीची मदत घेतल्या प्रकरण

प्रचारकी ‘नमो टीव्ही’
पवार पॉवर !
माझ्या हातात कागद आहेत का? – राहुल गांधी

मुंबईः महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी भाजपशी निगडित असलेल्या एका एजन्सीची मदत घेतल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांकडून अहवाल मागितला आहे.

इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी एक ट्विटमध्ये दावा केला की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आपली बाजू सोशल मीडियात मांडण्यासाठी भाजपच्या आयटी सेलला नियुक्त केले होते. भाजपच्या आयटी सेलमधील या कंपनीची नोंदणी अन्य कंपनीच्या नावे असून ही कंपनी भारतीय युवा जनता मोर्चाचे आयटी सेलचा संयोजक देवांग दवे चालवतात.

साकेत गोखले यांच्या ट्विटनंतर निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरन यांनी एक ट्विट करून या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून अहवाल मागितल्याचे सांगितले.

साकेत गोखले यांना मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाने (डीजीआयपीआर) निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियावरील प्रचारासाठी २०१८मध्ये साइनपोस्ट इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीकडे काम दिले होते. नंतर आयोगाने कंत्राट प्रक्रियेद्वारे हे काम साइनपोस्ट इंडियाला दिले. या साइनपोस्ट कंपनीचा २००८ सालमधील पत्ता २०२, प्रेसमन हाउस, विले पार्ले असा होता व या कंपनीवर सुशील पांडे, राजेश बत्रा, श्रीपाद अष्टेकर व दीपांकर चटर्जी हे संचालक आहेत.

पण हाच पत्ता अन्य एक कंपनी सोशल सेंट्रल मीडिया सोल्युशन्सचाही नावावर असून साइनपोस्टचा एकही संचालक अधिकृतपणे या कंपनीच्या संचालक मंडळावर नाही.

सोशल सेंट्रल मीडिया सोल्युशनचा मुख्य संचालक देवांग दवे हे असून त्यांच्या कंपनीची स्थापना २०१५मध्ये झाली होती.

या संदर्भात दवे यांनी असा दावा केला आहे की, विरोधी पक्षांना आपले राजकीय हितसंबंध साधायचे असल्याने त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. मी एका सामान्य मध्यमवर्गातून आलो असून राजकारणाची माझी कोणतीही पार्श्वभूमी नाही, तरीही माझ्या आरोप केले जात असून लवकरच या संदर्भात कायदेशीर पावले मी उचलणार आहे.

या प्रकरण पुढे आल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बलदेव सिंह यांनी डीजीआयपीआरने दिलेल्या सल्लानुसार राज्य सरकारने कंपनीला नियुक्त केले होते. या कंपनीच्या माध्यमातून मतदानाअगोदर मतदारांमध्ये जागरूकता पसरवण्याचा आयोगाचा उद्देश होता, असे म्हटले आहे.

योगायोगाने साकेत गोखले यांनी ट्विटरवर जी जाहिरात शेअर केली होती ती जाहिरात भाजपशी निगडित एजन्सीकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत मतदारांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहन देण्यात आले होते.

यावर राज्य निवडणूक आयुक्तांनी डीजीआयपीआरकडून विस्तृत माहिती मागवली असल्याचे सांगत शनिवारी आयोग आपले स्पष्टीकरण देईल असे म्हटले आहे.

दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित सोशल मीडियाचं काम राज्य निवडणूक आयोगाने एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देणं ही गंभीर बाब असल्याचे सांगत करत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

साकेत गोखले यांच्या आईला आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडून धमकी

राज्य निवडणूक आयोग व भाजपच्या आयटी सेलमधील संबंधांची माहिती ट्विटरवर प्रसिद्ध केल्यानंतर साकेत गोखले यांनी अयोध्येत होणार्या रामजन्मभूमीपूजन सोहळ्याविरोधातही याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५ ऑगस्टला अयोध्येत होणार्या राम मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. या याचिकेवरून शुक्रवारी साकेत गोखले यांच्या मुंबईतील मिरा रोड येथील निवासस्थानासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. या प्रसंगाचे व्हीडिओ चित्रिकरण गोखले यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केले व त्याकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व ठाणे ग्रामीण पोलिसांचे लक्ष वेधले. या ट्विटरची लगेचच दखल घेत गोखले यांना सरकारने पोलिस सुरक्षा पुरवली असून गोखले यांनी आपल्या आईलाही धमकवण्यात आल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी निदर्शकांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0