श्रमिकांना १२ तास काम करण्याची मुभा

श्रमिकांना १२ तास काम करण्याची मुभा

मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये श्रमिकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून ती भरून काढण्यासाठी राज्य सरकारने येत्या ३० जूनपर्यंत

मेधा पाटकर यांनी उपोषण सोडले
हिजाब प्रकरणाची सुनावणी सोमवारी
लोकदबावापुढे हाँगकाँगचे वादग्रस्त विधेयक मागे

मुंबई : लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये श्रमिकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून ती भरून काढण्यासाठी राज्य सरकारने येत्या ३० जूनपर्यंत श्रमिकांना १२ तास काम करण्याची परवानगी दिली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेक कामगार संघटनांनी नाराजी व विरोध दर्शवला असून या निर्णयामुळे अनेक श्रमिकांना आपल्या रोजगाराला, नोकरीलाही मुकावे लागेल अशी भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे.

औद्योगिक संघटनांसोबत झालेल्या चर्चेत श्रमिकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यात राज्याच्या कामगार खात्याने हा निर्णय घेतल्याचे इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे.

कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, अनेक श्रमिक, कामगार लॉकडाऊन पुकारल्यानंतर आपापल्या घरी गेले आहेत त्यामुळे श्रमिकांची मोठी कमतरता उद्योगांना भासत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध कामगारांना येत्या ३० जूनपर्यंत १२ तासाचे काम करू देण्याची फॅक्टरी कायद्यातील विशेष तरतूद सरकारने वापरली आहे. वास्तविक ८ तास काम व एक तास ओव्हरटाइमची तरतूद असते.

कामगार खात्याचे उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार यांनी काही शर्ती, अटींवर श्रमिकांना १२ तास काम करण्याची कारखानदारांना परवानगी दिल्याचे म्हटले आहे. या शर्तींमध्ये ४ तास अतिरिक्त काम केल्यास श्रमिकाला दैनंदिन पगाराच्या दुप्पट पगार देणे, कारखान्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करणे, हँड सॅनिटायझर, मास्क श्रमिकांना कामावर असताना देणे, शारीरिक अंतर राखण्याचे बंधन घालणे. या सर्व अटी केवळ श्रमिकांची कमतरता असलेल्या कारखान्यांना लागू आहे.

महाराष्ट्रात नोंदणीकृत ३६,६२३ कारखाने असून त्यामध्ये २८ लाख ५४ हजार श्रमिक काम करतात. बुधवारी यापैकी ५,४५८ कारखाने सुरू करण्यात आले असून त्यामध्ये २ लाख ४१ श्रमिकांनी काम करणे सुरू केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0