मविआ सरकार अडचणीत

मविआ सरकार अडचणीत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील संकट अजून वाढत चालले असून, महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रवास अडचणीत आल्याचे सकाळी स्पष्ट झाले. शिवसेनेचे बंडखोर

दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू झाल्यास १० लाखाची मदत
राज्यातील राजकीय संकट सर्वोच्च न्यायालयात
मतदारांच्या वतीने एकनाथ शिंदे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील संकट अजून वाढत चालले असून, महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रवास अडचणीत आल्याचे सकाळी स्पष्ट झाले.

शिवसेनेचे बंडखोर आमदार काल मध्यरात्री सुरतहून आसाम मधील गुवाहाटीमध्ये नेण्यात आले. तिथे पोहोचल्यानंतर बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे शिवसेनेचे ३३ आणि इतर असे मिळून ४० आमदार असल्याचे वक्तव्य केले.

आमदारांना रात्रीच खाजगी विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आले. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे.

शिवसेनेच्या वतीने शिंदे यांच्याबरोबर बोलणी सुरू असून, शिंदे पुन्हा पक्षात परततील असा विश्वास आजही सकाळी शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या बरोबर शिंदे यांनी सकाळी चर्चा केल्याचे राऊत यांनी सांगितले.

मात्र राऊत यांनी महाराष्ट्राचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट केले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अल्पमतात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.

कॉँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते शरद पवार यांच्याकडे जाणार आहेत. कॉँग्रेस पूर्ण ताकदीने सरकार बरोबर आहोत, अशी सोनिया गांधी यांची भूमिका कमलनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे समजते.

काही आमदारांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आज होणाऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकार बरखास्तीवर कोणतीही चर्चा होणार नाही. तसा कोणताही विचार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीने काम करणार आहे. या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी ५ वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला आहे. या बैठकीला जे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0