यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेनचा प्रवास मनस्तापाचा

यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेनचा प्रवास मनस्तापाचा

कोरोनाच्या संकटात दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या मराठी परीक्षार्थींसाठी रेल्वेची स्पेशल ट्रेन धावली खरी.. पण या ट्रेनचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठ

तळकोकणातले दशावतारी
महाराष्ट्राच्या कोरोनाविरुद्ध लढाईचे मोदींकडून कौतुक
प्रश्न: आपले आणि आमदारांचे – ३

कोरोनाच्या संकटात दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या मराठी परीक्षार्थींसाठी रेल्वेची स्पेशल ट्रेन धावली खरी.. पण या ट्रेनचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मनस्तापाचा ठरला. या संपूर्ण प्रवासात रेल्वेच्या आणि दिल्ली सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रचंड हाल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

शनिवारी रात्री ८ वाजता जुनी दिल्ली स्थानकावरून ही ट्रेन सुटणार होती. त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासूनच स्क्रीनिंगसाठी विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं होतं. ८ वेगवेगळ्या केंद्रावर विद्यार्थ्यांचं हे स्क्रीनिंग होणार होतं. संपूर्ण दिवसभर उन्हातान्हात हे विद्यार्थी सगळं सामान घेऊन या स्क्रीनिंगसाठी पोहचले. पण प्रत्यक्षात स्क्रीनिंग सुरू झालं ते संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास. त्यानंतर ट्रेन ८ वाजता सुटण्याऐवजी सव्वादहा वाजता सुटली.

महाराष्ट्र सरकारच्या विशेष प्रयत्नांनी ही ट्रेन आयोजित करण्यात आली होती. या ट्रेनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारनं उचलला होता. सध्या कोरोनामध्ये रेल्वेचे फूड स्टॉल, पॅन्ट्री कार बंद असल्यानं एकवेळचं जेवण रेल्वेकडून दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र शनिवारी रात्रीचं हे जेवण रेल्वेकडून मिळालंच नाही. त्यामुळे सकाळपासून उपाशीपोटी असलेल्या विद्यार्थ्यांचे आणखी हाल झाले. शिवाय महाराष्ट्र सरकारसाठी आयोजित या स्पेशल ट्रेनला रेल्वेनं अचानक ६ जनरल डबे जोडले. स्लीपर क्लासमध्ये अनेक ठिकाणी मोकळी जागा असतानाही अनेक विद्यार्थ्यांना याच जनरल डब्यात कोंबण्यात आलं. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडालाच, पण अनेक विद्यार्थ्यांना गर्दीत डब्यात खालीच झोपण्याची वेळ आली. जनरल डबे लॉक असल्यानं, ही स्पेशल ट्रेन असल्यानं तिचे थांबेही कमी असल्यानं या विद्यार्थ्यांना लवकर मदत मिळू शकली नाही.

अखेर रविवारी दुपारी एकच्या दरम्यान भुसावळ स्टेशनवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या वतीनं या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करण्यात आली. दिल्लीतून निघतानाही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही फूड पॅकेट्स, पाणी बॉटल व किटची व्यवस्था केली होती. पण रेल्वेच्या अशा नियोजनामुळे ही मदत जनरल डब्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकली नव्हती. या सगळ्या प्रकारानंतर या विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या कारभारावर तीव्र संतप्त व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0