निजामुद्दीन मरकज : ४४१ जण कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू

निजामुद्दीन मरकज : ४४१ जण कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू

मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन भागात १३ ते १५ मार्च दरम्यान तबलीग-ए- जमात या एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेणार्या शेकडो मुस्लिम भाविकांमधील ४४१ जणांना

महाराष्ट्र, पंजाबमध्ये कर्फ्यू, राज्यात सर्व जिल्हा सीमाबंद
तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरू ठेवावेत – ठाकरे
तिसऱ्या लाटेचा धोका आहेचः मुख्यमंत्री

मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन भागात १३ ते १५ मार्च दरम्यान तबलीग-ए- जमात या एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेणार्या शेकडो मुस्लिम भाविकांमधील ४४१ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला असून त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील ६ जण तेलंगण राज्यातील तर एक श्रीनगरचा आहे.

१३ मार्च ते १५ मार्च दरम्यान दिल्लीतील ख्वाजा निजामुद्दीन औलिया दर्गानजीक मरकजमध्ये अनेक सभा झाल्या. त्यात सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दुबई, उजबेकिस्तान, मलेशिया समवेत काही देशातील मुस्लिम धर्मप्रचारकांना सहभाग घेतला होता. यात देशातील ६०० हून अधिक भारतीय होते.

कोरोना संसर्गाने ज्या ६ जणांचा मृत्यू झाला त्यातील दोघे गांधी रुग्णालय तर दोन व्यक्तींचा एका खासगी तर एकाचा निझामाबाद तर अन्य एकाचा गढवाल शहरात मृत्यू झाला. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांची माहिती दिल्ली प्रशासनाने घेतली असून मृतांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे पत्ते मिळाले असून या सर्वांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१३ मार्चला तबलीग-ए- जमातचा कार्यक्रम होता तो संपल्यानंतर काही जणांची प्रकृती खालावल्याची व कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या कार्यक्रमात इंडोनेशिया व मलेशिया या देशातून २ हजाराहून अधिक प्रतिनिधी आले होते आणि हा कार्यक्रम संपल्यानंतरही काही दिवस लोक राहात होते. ही संख्याही वाढत गेली.

अखेर सोमवारी दिल्ली पोलिस व निमलष्करी दलाने निजामुद्दीन पश्चिम या संपूर्ण भागाला सील केले.

दिल्ली सरकारने मंगळवारपर्यंत १,१०७ जणांचे विलगीकरण केले असून काही जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये ठेवण्यात आले. एकूण दिल्लीत कोरोना संक्रमणाचे नवे ९७ रुग्ण आढळले आहेत, त्यात मरकजचे २४ रुग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरुंना एकत्र येण्यासंदर्भातील कोणतेही कार्यक्रम करू नये असे आवाहन केले आहे. तरीही असा कोणी प्रयत्न करत असल्यास संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीत ८०० ठिकाणी जेवणाची सोय

ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अशा सर्वांना रेशनवरचे धान्य मिळेल व त्याची जबाबदारी माझी राहील असेही केजरीवाल यांनी सांगितले. आज रेशन संपले असले तरी ते उद्या नक्की येईल, कुणाही भीती बाळगू नका, प्रत्येकाला धान्य मिळेल, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल त्यालाही धान्य मिळेल, सर्वांसाठी धान्याची सोय असेल असे केजरीवाल यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे अडकून बसलेल्या लाखो लोकांसाठी दिल्लीत ८०० ठिकाणी जेवण्याची सोय करण्यात आली आहे, तसेच २५०० शाळा, २५० रैन बसेरा येथेही जेवणाची सोय करण्यात आली आहे. दिल्ली शहरात रोज साडेतीन ते ५ लाख लोकांना जेवण मिळत आहे. पुढील दोन दिवसांत सुमारे १२ लाख लोकांना जेवण मिळेल, असे प्रयत्न दिल्ली सरकारकडून केले जात आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0