स्थलांतरितांना भय दाखवू नका – सर्वोच्च न्यायालय

स्थलांतरितांना भय दाखवू नका – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोरोना विषाणूपेक्षा लोकांमध्ये भय निर्माण झाल्यास त्याने अधिक मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशातील स्थ

कोविड-१९- तिसरी लाट रोखण्याच्या सूचना जाहीर
‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’
शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक

नवी दिल्ली : कोरोना विषाणूपेक्षा लोकांमध्ये भय निर्माण झाल्यास त्याने अधिक मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशातील स्थलांतरीत मजुरांचे प्रबोधन करावे, त्यांना निवारे घरे, वैद्यकीय सुविधा व जेवण पुरवावे. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांचे प्रबोधन होण्यासाठी समाज नेतृत्वांची मदत घ्यावी व कोरोना विषाणू संसर्गाची देशभरातील परिस्थिती लोकांपर्यंत जाण्यासाठी २४ तासात एक पोर्टल चालू करावे, असे निर्देश दिले. असे पोर्टल सुरू केल्याने देशभरात कोरोनासंदर्भात जी खोटी माहिती पसरवली जात आहे, त्याला आळा बसण्यास मदत होईल, असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले.

स्थलांतरितांना थांबवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, तो टाळावा व स्थलांतरितांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घ्यावी असेही न्यायालयाने सांगितले. स्थलांतरितांना भय दाखवू नये, त्याने प्रश्न अधिक गंभीर होईल असेही न्यायालयाने सांगितले.

यावर सरकारची बाजू मांडताना अटर्नी जनरल तुषार मेहता यांनी देशभरात २२ लाख ८० हजार नागरिकांना जेवण पुरवले जात असून यामध्ये गरजू, स्थलांतरित, रोजंदारीवर काम करणारे नागरिक असल्याचे सांगितले. ज्यांच्याकडे निवार्याची सोय नाही त्यांच्या राहण्याची सोय केल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0