पाकिस्तानी पत्रकारावरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

पाकिस्तानी पत्रकारावरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

नवी दिल्ली: पाकिस्तानी पत्रकार अयाझ अमीर यांच्यावर झालेल्या हल्ल्याकडे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) लक्ष वेधले आहे. अयाझ अमीर १ जुलै रोज

अदानी कंपन्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका?
गर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस
संघवादी सरकार अजूनही आर्यांच्याच शोधात!

नवी दिल्ली: पाकिस्तानी पत्रकार अयाझ अमीर यांच्यावर झालेल्या हल्ल्याकडे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टने (आयएफजे) लक्ष वेधले आहे. अयाझ अमीर १ जुलै रोजी लाहोरमध्ये एक टेलीव्हिजन कार्यक्रम करून बाहेर पडले असता, त्यांच्यावर हल्ला झाला होता.

आयएफजेची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, ही पत्रकारांची जगातील सर्वांत मोठी संघटना आहे.

अमीर यांनी दुनया न्यूज या वाहिनीसाठी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि चित्रीकरण संपल्यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांच्या कारचा रस्ता आणखी एका वाहनाने अडवला आणि सहा अज्ञात हल्लेखोर त्यांच्या दिशेने धावून आले. त्यांनी अमीर यांना गाडीतून बाहेर पडण्यास भाग पडले, त्यांच्याकडील पैसे व फोन काढून घेतला, त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांचे कपडे फाडले. हल्लेखोरांनी त्यांना धमक्याही दिल्या. यात अमीर यांच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी खरचटले.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात, अमीर यांनी पाकिस्तानच्या लष्करावर टीका केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाल्याचे आयएफजेने म्हटले आहे. लष्करातील जनरल हे ‘प्रॉपर्टी डीलर्स’ आहेत अशी टीका अमीर यांनी त्यांच्या भाषणात केली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानही या चर्चासत्राला उपस्थित होते. ‘तुम्ही देश या प्रॉपर्टी डीलर्सच्या हातात दिला आहे’ असे अमीर इमरान यांना म्हणाले.

इमरान खान यांनी अमीर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

आयएफजे आणि या महासंघाची पाकिस्तानातील शाखा पाकिस्तान फेडरल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (पीएफयूजे) यांनी अमीर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यामागील सूत्रधारांना त्वरित कायद्यापुढे आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाकिस्तानभरातील पत्रकारांनी अमीर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि अशा घटनांचा देशातील माध्यम स्वातंत्र्यावर विघातक परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

आयएफजेच्या दक्षिण आशियातील माध्यम स्वातंत्र्याबाबतच्या २०२१-२२ या सालातील अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानातील पत्रकार व माध्यमांतील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेशी निगडित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यांमध्ये पत्रकारांवर त्यांच्या कामामुळे शारीरिक हल्ले करण्याचे प्रमाण वाढत आहे.

पंजाबच्या पोलीस महानिरीक्षकांनी या हल्ल्याचा तपास करावा, अशी विनंती पंजाबचे मुख्यमंत्री हमझा शेहबाझ यांनी केली आहे.

पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनीही या हल्ल्याची दखल घेतली आहे, असे दुनया न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0