तालिबानची ‘बीबीसी’, ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’वर बंदी

तालिबानची ‘बीबीसी’, ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’वर बंदी

डीडब्लूः अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने ब्रिटिश प्रसार माध्यम कंपनी बीबीसी व व्हॉइस ऑफ अमेरिका न्यूज ब्रॉडकास्टवर बंदी घातली आहे. तालिबानच्या सरकारने रविवारी हा निर्णय घेतला.

तालिबानच्या या निर्णयावर बीबीसीने तीव्र नाराजी व्यक्त करत अफगाणिस्तानातल्या अस्थिर व अराजकाच्या वातावरणात अशी बंदी तालिबानकडून घातली जाणे हे वेदनादायक व चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया बीबीसीने दिली आहे. तटस्थ, निरपेक्ष व स्वतंत्र पत्रकारिता अफगाणिस्तान नाकारू शकत नाही असेही मत बीबीसी वर्ल्ड सर्विसच्या सर्वभाषिक विभागाचे प्रमुख तारिक कफाला यांनी व्यक्त केले. अफगाणिस्तानातील सुमारे ६० लाख जनता बीबीसीच्या स्वतंत्र व तटस्थ पत्रकारितेची साक्षीदार आहे. अशा पत्रकारितेला जनतेपासून हिरावून घेणे अयोग्य आहे. तालिबानने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा व आमच्या सहभागी वृत्तसंस्थेवरची बंदी मागे घ्यावी आणि वृत्तसेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी असेही कफाला यांनी म्हटले आहे.

तालिबानने बीबीसी बरोबर व्हॉइस ऑफ अमेरिका या वृत्तसंस्थेवरही बंदी घातली आहे. व्ह़ॉइस ऑफ अमेरिका बंद करण्याचे आदेश तालिबानच्या गुप्तचर खात्याकडून आले होते, त्याला अफगाणिस्तानातील मीडिया कंपनी मोबेने दुजोरा दिला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक पत्रकारांनी देशाबाहेर पलायन केले होते.

मूळ बातमी

COMMENTS