राजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा

राजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा

जयपूर/नवी दिल्लीः फेब्रुवारी २०२१मध्ये राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात काँग्रेस आमदाराचा एक मुलगा व अन्य चार

मुख्यमंत्री बनण्यास नितीश कुमार अनुत्सुक
सरकार ठरवणार दहशतवादी कोण : यूएपीए विधेयक संमत
पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी

जयपूर/नवी दिल्लीः फेब्रुवारी २०२१मध्ये राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात काँग्रेस आमदाराचा एक मुलगा व अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या आमदाराचे नाव जौहरी लाल मीणा असे असून आरोपी मुलाचे नाव दीपक मीणा असे आहे. जौहरी लाल मीणा हे अलवार जिल्ह्यातील राजगढ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या मुलावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींपैकी एक आरोपी विवेक शर्मा असून याने पीडितेवर गँगरेपचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून १५ लाख रु.ची रोख रक्कम व दागिने मागितले होते. पोलिसांनी या संदर्भातही वेगळा गुन्हा विवेक शर्मा याच्यावर दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी पीडित मुलीचा जवाबही नोंदवला असून तिची वैद्यकीय तपासणीही केली आहे.

ही घटना फेब्रुवारी २०२१मधील असून आरोपीने मुलीला महवा-मंडावर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेले व तिच्यावर बलात्कार करून त्याचा अश्लिल व्हीडिओही तयार केला. पीडित मुलीने घाबरून आरोपींना आपल्या घरातील दागदागिने व पैसे चोरून दिले. पण पीडित मुलीच्या कुटुंबियांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. तपासाअंती स्वतः पीडितेने आपल्या सोबत झालेली घटना आईला सांगितली होती.

दरम्यान शनिवार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणात दोषींना कडक कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस पक्ष या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत असून भाजप पक्ष जसा बलात्काराचा आरोप असलेल्या आमदार कुलदीप सेंगर याच्या मागे उभा होता, तसा आमचा पक्ष उभा राहणार नाही, असे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0