‘भारत बायोटेक’ संबंधी ‘द वायर’ व ‘द वायर सायन्स’ येथे प्रसिद्ध झालेले १४ लेख काढून टाकावेत असा एकतर्फी आदेश तेलंगणमधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका स्थ
‘भारत बायोटेक’ संबंधी ‘द वायर’ व ‘द वायर सायन्स’ येथे प्रसिद्ध झालेले १४ लेख काढून टाकावेत असा एकतर्फी आदेश तेलंगणमधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका स्थानिक न्यायालयाने दिल्याचे वृत्त ‘बार अँड बेंच’मध्ये दिसून आले आहे. या १४ लेखांमुळे ‘भारत बायोटेक’ची बदनामी झाली, त्यावरून न्यायालयाने हा निर्णय दिला असावा असे वाटते. ही याचिका ‘भारत बायोटेक’ने दाखल केली असावी असेही वाटते. पण या एकूण प्रकरणाबाबत ‘द वायर’ व त्याच्या संपादकांना न्यायालयाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही वा त्यांना अशी कोणतीही माहितीही देण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर ‘भारत बायोटेक’च्या वकिलांनी ‘द वायर’शी संपर्कही साधलेला नाही. ‘बार अँड बेंच’मधून माहीत झालेला तेलंगणमधील न्यायालयाचा हा आदेश ‘द वायर’चे म्हणणे ऐकून न घेता व त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही न देता जारी केलेला दिसत आहे. अर्थात अशा आदेशावर ‘द वायर’ कायदेशीर दाद मागणार आहे. आम्हाला असा कोणताही आदेश मिळालेला नाही वा त्याची साक्षांकत प्रतही मिळालेली नाही.
भारतीय राज्यघटनेने प्रसार माध्यमांना स्वातंत्र्याची हमी दिली आहे. त्यांना तो अधिकार दिला आहे. या अधिकारांतर्गत देशातील प्रसार माध्यमे आपले काम करत असतात. या अधिकारांतर्गत ‘द वायर’ने ‘भारत बायोटेक’वर अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. आम्ही प्रसार माध्यमांवर अंकुश आणणाऱ्या सर्व प्रयत्नांना कायदेशीर विरोध करत राहू.
एमके वेणु
सिद्धार्थ भाटिया
सिद्धार्थ वरदराजन
मूळ वृत्त
COMMENTS