नवतरुण पिढीचे (अपराधग्रस्त) सीतारामन यांना पत्र

नवतरुण पिढीचे (अपराधग्रस्त) सीतारामन यांना पत्र

श्रीमती सीतारामनजी तुम्ही आमच्या पिढीच्या मानसिकतेविषयी जे बोलला त्याच्याशी मी सहमत आहे. आमच्या पिढीची कार घेण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्यामागचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, ती घेणे मला परवडत नाही. तुम्ही असेही म्हणालात, की कर्जाचे हफ्ते फेडण्याची तयारी नवतरुणांची नाही. तेही बरोबर आहे. कारण कोणत्याही गोष्टीची कमिटमेंट दीर्घकाळ ठेवायची ही आमच्या पिढीची मानसिकता नाही. अगदी लग्नाबाबत, घर विकत घेण्याबाबत, एवढंच काय तर मुलं होण्याबाबतही..

सूक्ष्म-मध्यम उद्योग पॅकेज : खर्चाची झळ सरकारला नाहीच!
माहिती-आकडेवारी जाहीर करा – २०० अर्थतज्ज्ञांची मागणी
उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?

प्रिय सीतारामनजी

सध्या वाहन उद्योगात जी मंदी भेडसावत आहे, ती नवतरुण पिढीच्या सवयींनी -ज्यामध्ये मी स्वत:ही आहे- आलीय असे तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणालात.

तुम्ही असेही म्हणालात, की सध्याच्या नवतरुण पिढीचा कल कर्ज काढून स्वत:ची कार घेण्याऐवजी भाडे देऊन ओला-उबेर वा मेट्रोने प्रवास करावा याकडे आहे. आयुष्यभर कर्जाचे हफ्ते कोण फेडत बसणार अशीही नवतरुणांची मानसिकता आहे.

मी चुकले… तुम्ही आमच्या पिढीच्या मानसिकतेविषयी जे बोलला त्याच्याशी मी सहमत आहे. आमच्या पिढीची कार घेण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्यामागचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, ती घेणे मला परवडत नाही. तुम्ही असेही म्हणालात, की कर्जाचे हफ्ते फेडण्याची तयारी नवतरुणांची नाही. तेही बरोबर आहे. कारण कोणत्याही गोष्टीची कमिटमेंट दीर्घकाळ ठेवायची ही आमच्या पिढीची मानसिकता नाही. अगदी लग्नाबाबत, घर विकत घेण्याबाबत, एवढंच काय तर मुलं होण्याबाबतही..

तर आम्हाला काय आवडतं? नेटफ्लिक्स, इंटरनेटवर गप्पाटप्पा, कपडे फॅशनवरच्या चर्चा..

पण जेव्हा आम्ही इंटरनेटवर अनेक वस्तू पाहात असतो. तेव्हा तुमच्यादृष्टीने महत्त्वाच्या नसतील पण आमच्या पिढीला महत्त्वाच्या वाटणाऱ्या ‘लिपस्टिक इंडेक्स’पाशी आम्ही थांबतो आणि थोडा विचार करतो. अर्थशास्त्रात ‘लिपस्टिक इंडेक्स’ हा एक गंमतीशीर मुद्दा मांडला गेला आहे. हा इंडेक्स बाजारात मंदी आहे की नाही हे दर्शवतो. म्हणजे बायकांकडे पैसे कमी असले की त्या महागडे कपडे किंवा चपला-शूज खरेदी न करता लिपस्टिक खरेदीकडे वळतात.

श्रीमती सीतारामनजी तुमची फेवरेट शेड कोणतीय?

सध्याचा लिपस्टिक इंडेक्स अर्थव्यवस्था संकटात असल्याचे दाखवतोय.

श्रीमती सीतारामनजी, महागाईची झळ बसणाऱ्या बोटीत अनेक जण आहेत. त्यात मी वा ‘उबर पूल’मध्ये एकटीच नाही तर ज्या ३१ टक्के मंडळींनी गेल्या वर्षभरात कार विकत घेतल्या आहेत त्यांनाही अर्थव्यवस्था संकटात असल्याची झळ बसू लागली आहे. आणि मी खात्रीने सांगू शकते की यामध्ये नवतरुण पिढीची संख्या निश्चितच कमी आहे.

स्वत:ची कार असावी अशी माझी खूप इच्छा. माझ्याकडे एक कुत्राही आहे (त्याच्या सवयी नवतरुण पिढीसारख्या आहेत).  माझ्या कुत्र्याला ‘मेलो’ला खिडकीत उभे करून त्याच्यासोबत देशभर फिरावं असं माझं स्वप्न आहे.

पण मला सगळीकडे जाणवतंय की लोकं वस्तू खरेदी करताना दिसत नाहीत. खरेदी न करण्याचं एक कारण आपली अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. ही संकटे कोणी ओढवून आणली आहेत? ती नवतरुणपिढीने तर नक्कीच नाही. तुमच्यासारख्या अर्थमंत्र्यांनी जे नवतरुण पिढीत नाहीत त्यांच्या निर्णयाने हे संकट उभे राहिले आहे.

वास्तविक लोकांची खरेदीक्षमता खालावत गेली ती नोटबंदीच्या निर्णयानंतर. रिझर्व्ह बँकेने नुकतेच हेच कारण दिलेय. आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने ‘कठोर कारवाई’ असे सांगत नोटंबदीचा निर्णय घेतला आणि बँकांकडून कर्जे घेण्याचे प्रमाण वेगाने खाली आलं. ते आजही सुरूच आहे.

देशातला वाहन उद्योग हा काही एकमेव संकटात सापडलेला नाही. या घडीला टेक्सटाईल उद्योगही तेवढ्याच आणि गंभीर संकटात सापडला आहे. या उद्योगाची ३३ टक्क्याने निर्यात घटल्याचे विधान टेक्सप्रोसिलचे संचालक डॉ. के. व्ही. श्रीनिवासन यांनी केलेय. (हे गृहस्थ नवतरुण पिढीचे नक्कीच नाहीत) त्यांनी गेल्या पाच वर्षातले निर्यातीचे प्रमाणही घटल्याचे सांगितलेय.

या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कठीण आहेत हे मी मान्य करते. पण पारंपरिक ‘बहीखाता’ वापरणाऱ्या तुम्हाला त्या अधिक चांगल्या समजत असतील. मी नुकतीच किशोरवयीन गटातून बाहेर पडलीय त्यामुळे मी त्या अर्थाने नवतरुणपिढीची प्रतिनिधी नाही.

श्रीमती सीतारामनजी मध्यंतरी ‘पार्ले-जी’ कंपनीने मंदीच्या कारणामुळे त्यांच्या १० हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे ठरवले होते, असे वाचण्यात आले होते. अशा बातम्या वाचल्या आणि वाटलं की, माझ्या लहानपणातल्या ‘पार्ले-जी’च्या आठवणीही काही काळाने धुसर होत जातील.

‘पार्ले-जी’चे कंपनीचे एक प्रमुख मयांक शहा यांनी आपल्या व्यवसायावर लावण्यात आलेल्या जीएसटीचे दर कमी केले नाहीत तर मोठे संकट येईल अशी भीती व्यक्त केली होती. निल्सनच्या सर्वेक्षणात ‘एफएमसीजी’ क्षेत्र गेल्या चार तिमाहीत घसरणीकडे चालला असल्याचे दिसून आले होते. म्हणजे लोकांना काहीच खरेदी करण्याची इच्छा नाही. त्यांना स्वस्तातील बिस्किटेही घेणे परवडत नाही असं वाटतं.

मी जरा मोठी झाली आहे. दुधावरून चहा पिण्याएवढे माझे वय झाले आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की, १७० वर्षे जुनी असलेली आसाममधील चहाची इंडस्ट्री अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. चहाचे उत्पादन मूल्य वाढत चालले आहे पण चहाची बाजारपेठ मागणीविना तोट्यात चालली आहे. लोक एक चहा पिण्यासाठी जेवढा खर्च करतात तेवढाच  आता खर्च करताना दिसतात.

आपली अर्थव्यवस्था सर्वच क्षेत्रात मंदगतीने चालली आहे. बाजारात पैसा नसल्याने गृहबांधणी क्षेत्राचे छप्पर कोसळलेय, तशीच स्थिती आपल्या विमान वाहतूक क्षेत्राची. तेही जमिनीवर कोसळलेय. काही दिवसांपूर्वी देशातील परिस्थिती सांगताना हिंदुस्थान लिव्हर या कंपनीच्या व्यवस्थापनातील एक ज्येष्ठ अधिकाऱ्याने मंदी हा शब्द वापरला होता. शाळेत अर्थशास्त्राच्या पुस्तकात मी हा शब्द वाचला होता, तो मला आज आठवतोय.

तुम्ही काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेचा वेग कमी झालाय असे मान्य केलं होतं. तुम्ही अर्थसंकल्पात मांडलेल्या काही तरतूदीही मागे घेतल्या होत्या. पण त्याचा परिणाम असा झाला की, परकीय गुंतवणुकदारांनी त्यांचे २० हजार कोटी रुपये अर्थव्यवस्थेतून काढून घेतले. तुम्ही गर्भश्रीमंतांना लावलेला मोठा करही मागे घेतला. थोडक्यात ‘अच्छे दिन’ त्यांना मिळाले.

देशात बेरोजगारीचा प्रश्न भयावह झाला आहे पण तुमचे सरकार त्याकडे दुर्लक्ष करतेय. हे बेरोजगार नवतरुण पिढीचेच आहेत. त्यांनाच सर्वाधिक फटका बसत आहे. शेतीही संकटात सापडली आहे. नवतरुण पिढी शेतीकडे वळण्यास तयार आहे पण त्यांना तेथेही रोजगार मिळत नाही.

अन्य कोणत्याही वयोगटापेक्षा १५ ते २५ वयोगटातील बेरोजगारीचा दर १२.५ टक्के इतका आहे. सुशिक्षितांना बेरोजगारीचा अनुभव मिळतोय. सुमारे १३ टक्के पदवीधर व १६ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बेरोजगार आहेत. हे तरुण पगार मिळत नसताना स्वत:ची कार असावी अशी स्वप्ने बाळगू शकतील असे तुम्हाला वाटतेय? पदवीधर असलेल्या देशातल्या आर्थिक व सामाजिक दुर्बल जातींतील ३४ टक्के महिलांकडे नोकऱ्या नाहीत. हे चित्र चिंताजनक होत चाललेय.

आपली स्वत:ची कार वा घर असावे असे माझ्या पिढीला नक्की आवडेल. आम्ही त्यासाठी प्रयत्नही करू, आम्ही आमच्या आशा, स्वप्ने साकार करण्यासाठी कट्‌ट्यावर चर्चा करत असतो. ही स्वप्ने मांडतानाच आम्ही हसत असतो. रोज हसत असतो. आजही आम्ही हसलो. कारण आम्ही विनोद तुमच्या खर्चाकडे पाहून केला. श्रीमती सीतारामन अर्थव्यवस्थेचे जे काही तुम्ही कराल ते आमच्याच कामी येणार आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0