संरक्षण खात्याने २०१७ नंतरचे रिपोर्ट वेबवरून हटवले

संरक्षण खात्याने २०१७ नंतरचे रिपोर्ट वेबवरून हटवले

नवी दिल्लीः संरक्षण खात्याने आपल्या वेबसाइटवरून २०१७ नंतरचे सर्व मासिक अहवाल काढून टाकले आहेत. या अहवालात २०१७मध्ये चीनसोबत तणाव निर्माण झालेले डोकलाम

बिटविन द डेव्हिल अँड द डीप सी
अग्निपथ भरतीत सहकार्य नसल्याने लष्कर पंजाबवर नाराज
शोपियन मजूरांचे एन्काउंटरः साक्ष पूर्ण

नवी दिल्लीः संरक्षण खात्याने आपल्या वेबसाइटवरून २०१७ नंतरचे सर्व मासिक अहवाल काढून टाकले आहेत. या अहवालात २०१७मध्ये चीनसोबत तणाव निर्माण झालेले डोकलाम प्रकरण असून या प्रकरणात भारत व चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला नव्हता असे उल्लेख आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये लडाखमध्ये चीनद्वारे आक्रमण झाल्याचा हवाला देणारा जून २०२० मासिक अहवाल संरक्षण खात्याने काढून टाकला होता. त्यानंतर ही नवे पावले उचलली आहेत. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

हे सर्व अहवाल काढून टाकण्यामागील कारण या अहवालांमध्ये नव्याने दुरुस्ती व ती अधिक व्यापक करण्याचे असल्याचे सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे. या ऑक्टोबर अखेर हे सर्व अहवाल वेबसाइट पुन्हा प्रसिद्ध होतील असे सांगण्यात येत आहे.

जून २०२० च्या चार पानांच्या मासिक अहवालात ५ मे २०२० पासून प्रत्यक्ष ताबा रेषेवर गलवान खोर्यात चीनचे आक्रमण वाढले असून १७-१८ मे २०२०मध्ये चीनने कुगरांग नाला, गोगरा व पँगाँग त्सो सरोवरच्या उत्तरेकडे आक्रमण केल्याचे उल्लेख होते.

या अहवालात गलवान खोर्यात १५ जून रोजी भारतीय सैनिक व चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्याचेही नमूद करण्यात आले होते, व या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

एप्रिल व मे महिन्याच्या संयुक्त अहवालात चीनच्या आक्रमणाचा उल्लेख नव्हता पण त्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर संकट आल्याची विस्तृत माहिती देण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0