‘तुम्ही वर्तमानपत्राचे पत्रकार, व्हिडिओ का काढले?’

‘तुम्ही वर्तमानपत्राचे पत्रकार, व्हिडिओ का काढले?’

मिर्झापूर : आपण प्रिंट मीडियाचे पत्रकार असताना फोटो काढण्याऐवजी व्हिडिओ का काढला, असा सवाल मिर्झापूरचे जिल्हाधिकारी अनुराग पटेल यांनी पत्रकार पवन जयस्

जगभरात २७८ पत्रकारांच्या हत्या, ८१ टक्के हत्यांचे सूत्रधार मोकाट
पत्रकार मनदीप पुनिया यांना जामीन
डॅनी अमेरिकेत परतला !

मिर्झापूर : आपण प्रिंट मीडियाचे पत्रकार असताना फोटो काढण्याऐवजी व्हिडिओ का काढला, असा सवाल मिर्झापूरचे जिल्हाधिकारी अनुराग पटेल यांनी पत्रकार पवन जयस्वाल यांना विचारला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह भोजना योजनेंतर्गत मुलांना भाकरीसोबत मीठ देत असल्याचे वृत्त देणारे ‘जनसंदेश टाइम्स’चे पत्रकार पवन जयस्वाल यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा हेतू सरकारची प्रतिमा मलिन करण्याचाच होता आणि ते वर्तमानपत्रातील पत्रकार असताना त्यांनी फोटो काढायला हवे होते पण त्यांनी व्हिडिओ काढून त्यामध्ये लोकांना सामील होण्यास सांगितले. हे सर्व सरकारविरोधात कटकारस्थान असल्याच्या भूमिकेवर जिल्हाधिकारी ठाम आहेत. जयस्वाल यांनी गावातल्या काहींशी संगनमत करून हा व्हिडिओ काढल्याचाही जयस्वाल यांनी आरोप केला आहे.

जयस्वाल यांची चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जयस्वाल यांच्या बातमीत तथ्य असल्याचे मान्य केले होते आणि त्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित केले होते. त्यांनी मुलांना मीठ आणि भातही देत असल्याचे कबूल केले होते. पण आता त्यांनी आपल्या विधानात बदल करत, खिचडीत मीठ घातले जाते. डाळ पण वाढली जाते. त्यामुळे खिचडीत मीठ, तांदूळ व डाळ असते असे म्हटले आहे.

दरम्यान बुधवारी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून पवन जयस्वाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्याचे ठरवले आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आपला अहवाल द्यावा अशी विनंती करत हे संपूर्ण प्रकरण समितीपुढे ठेवावे अशी विनंती केली आहे.

तर ‘द एडिटर गिल्ड ऑफ इंडिया’ने पत्रकार पवन जयस्वाल यांना आपला पाठिंबा दिला असून उत्तर प्रदेश सरकारच्या या प्रकरणातील भूमिकेचा निषेध केला आहे. खऱ्या बातमीचा बळी घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशीही त्यांनी टीका केली आहे.

पार्श्वभूमी

२३ ऑगस्टला ‘जनसंदेश टाइम्स’ या वर्तमानपत्रात काम करणारे पत्रकार पवन जयस्वाल यांनी मिर्झापूर जिल्ह्यातील १०० पटसंख्या असलेल्या एका सरकारी शाळेत माध्यान्ह भोजन योजनेनुसार आठवीतील विद्यार्थ्यांना भाकरीसोबत मीठ देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओने देशभर खळबळ उडाली होती. या वृत्ताने उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीवर व भ्रष्टाचारावर चोहोबाजूंनी आरोप होऊ लागल्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. गेल्या सोमवारी जिल्हाधिकारी अनुराग पटेल यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी पत्रकार पवन जयस्वाल, सरपंच राजकुमार पाल व एका अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल करून या तिघांनी खोटा व्हिडिओ सादर केल्याची तक्रार करत या तिघांविरोधात आयपीसीअंतर्गत १२० ब, १८६, १९३ व ४२० कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0