३ जानेवारीपासून किशोरांचे लसीकरण

३ जानेवारीपासून किशोरांचे लसीकरण

नवी दिल्लीः कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून व ओमायक्रॉन या नव्या कोरोना विषाणू प्रजातीचा धोका लक्षात घेता येत्या ३ जाने

कोविड आरटीपीसीआर चाचण्या, लसीकरण वाढवण्याचे निर्देश
राज्यात १८ वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात
सोमवारी (कथित) ‘विक्रम’, मंगळवारी लसीकरणात घसरण

नवी दिल्लीः कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून व ओमायक्रॉन या नव्या कोरोना विषाणू प्रजातीचा धोका लक्षात घेता येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील किशोर मुलांना लसीकरण मोहिमेत सामील करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. शनिवारी रात्री देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. देशातील १३० कोटी जनतेला कोविड-१९ प्रतिबंधित लस देण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा हा भाग असल्याचे मोदी म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोवि-१९  लस देण्याबरोबरच ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड-१९चा तिसरा डोसही देण्यात येईल असे मोदींनी जाहीर केले. हा लसीकरण कार्यक्रम १० जानेवारीपासून सुरू होईल. याच बरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाइन वर्कर्सना १० जानेवारीपासून तिसरा कोविड-१९ प्रतिबंधित डोस मिळणार आहे. मोदींनी आपल्या भाषणात तिसऱ्या डोसचा ‘बुस्टर डोस’ असा उल्लेख न करता ‘प्रिकॉशन डोस’ असा उल्लेख केला.

आपत्कालिन स्थितीत भारत बायोटेकची लस तरुणांना मिळणार

१२ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोविड-१९ प्रतिबंधित लस मिळणार आहे. ही लस आपत्कालिन परिस्थितीत देण्यात येणार आहे. शनिवारी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकला मंजुरी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0