नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत महत्त्वपूर्ण बदल केला असून आता राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिव
नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत महत्त्वपूर्ण बदल केला असून आता राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिवसा व रात्रीही फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय ध्वज सूर्यादय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्यात यावा असा नियम होता.
सरकारने राष्ट्रीय ध्वज पॉलिएस्टर व मशीनने तयार केला असल्यास तसाही वापरण्यास परवानगी दिली आहे. या पूर्वी राष्ट्रीय ध्वज खादीचा असावा असा नियम होता.
स्वातंत्र्याला अमृतमहोत्सव पूर्ण होत असल्याने सरकारने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट य दरम्यान प्रत्येक घरी तिरंगा (हर घर तिरंगा) हा देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेमाचा उत्साह निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.
सरकारने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या नियमात व संहितेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार आता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला जाऊ शकतो. तसेच कोणीही नागरिक आपल्या घरामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो.
मूळ वृत्त
COMMENTS