मुख्यमंत्री निधीला काँग्रेस आमदारांकडून मासिक वेतन

मुख्यमंत्री निधीला काँग्रेस आमदारांकडून मासिक वेतन

मुंबई: कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत

काँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार?
उ. प्रदेशात काँग्रेस ४० टक्के तिकिटे महिलांना देणार
‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’

मुंबई: कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचे एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ लाख रूपये आणि अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

गुरुवारी रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना थोरात म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 अमृत उद्योग समूहच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहा. निधीत जमा

थोरात म्हणाले की, मी काही सहकारी संस्थांचे नेतृत्व करतो, अमृत उद्योग समुहातील या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कम त्या सहकारी संस्था स्वीकारणार असून, त्यासाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.

काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरिक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो, असे थोरात म्हणाले.

कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0