‘त्या’ तिघांना का सोडले – नवाब मलिक

‘त्या’ तिघांना का सोडले – नवाब मलिक

मुंबई क्रूझ पार्टी ड्रग प्रकरण हे बनावट आहे.  त्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्याच आदेशावरून तीन लोकांना एनसीबीने सोडल्याचा आरोप

‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला शांततेचे नोबेल
पीएम केअर्स : लपवाछपवी व टोलवाटोलवी
‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन

मुंबई क्रूझ पार्टी ड्रग प्रकरण हे बनावट आहे.  त्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्याच आदेशावरून तीन लोकांना एनसीबीने सोडल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि आणखी आरोप केले. ते म्हणाले, “एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितले, की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र त्यांनी ११ जणांना  ताब्यात घेतले होते. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आले. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव नुकत्याच झालेल्या जमीनाच्या सुनावणीदरम्यान आले आहे. या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, ११०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडले, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला,” असे मलिक यांनी आरोप केले.

या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधी केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचे नाव जाहीर केले. ते म्हणाले, “सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.”

मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांना सवाल केला, की या प्रश्नांची उत्तरे द्या आणि अगोदर केलेल्या आरोपांवरी खुलासा करावा.  तसेच या सगळ्या प्रकरणात जे जे संबंधीत लोक आहेत, त्यांचे आणि समीर वानखेडे यांचे फोन कॉल तपासावेत, अशी मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला होता. नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला होता. आज हा आरोप त्यांनी पुन्हा केला. एनसीबीने ज्या ठिकाणी छापा टाकला त्या क्रूझवर ड्रगचे फोटो न काढता, एनसीबीच्या कार्यालयात फोटो काढल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

आज मलिक यांनी अनेक फोटो दाखवत भाजपकहा संबंध या प्रकरणाशी कसं आहे, हे पुरावे दाखवत संगितले. तसेच आर्यन खान याला खास त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आले होते आणि हा सगळंच एक मोठा कट असल्याचे सांगितले.

दरम्यान ‘एनसीबी’चे सहसंचालक समीर वानखेडे यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. “आम्ही १४ जणांना ताब्यात घेतले होते. मात्र ज्यांच्याकडे काही सापडले नाही त्यांना सोडून दिले. पण तपास अजून सुरू आहे, ” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तुमचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी करण्यात आली आहे, असे विचारता ते म्हणाले, की न्यायालय सांगेल त्याप्रमाणे आम्ही काम करू.

‘एनसीबी’ ही कोणत्याही पक्षासाठी काम करीत नसून व्यावसायिक एजन्सी असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0