पिगॅसस: एनएसओ ग्रुप सीईओचा राजीनामा, १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले

पिगॅसस: एनएसओ ग्रुप सीईओचा राजीनामा, १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले

विवादास्पद स्पायवेअर पिगॅससचे निर्मात्या इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपचे सीईओ शालेव हुलिओ, यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत राजीनामा देणारे ते दुसरे अधिकारी आहेत.

राफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही
शेतकरी संघटनांचा ८ डिसेंबरला भारत बंद
क्रौर्याचा अहवाल

नवी दिल्ली: वादग्रस्त इस्रायली गुप्तचर सॉफ्टवेअर कंपनी एनएसओ ग्रुपचे सह-संस्थापक शालेव हुलियो यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच कुप्रसिद्ध पिगॅसस स्पायवेअरवरून वादात सापडलेली ही कंपनी आपल्या शंभर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, एनएसओ ग्रुप आपल्या ७०० पैकी १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे, तर कंपनीचे ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ यारॉन शोहात हे यापुढे कंपनीचे नित्याचे व्यवहार आणि व्यवस्थापन पाहणार आहेत.

इस्रायली वेबसाइट कॅल्कलिस्टनुसार, शालेव हुलियो कंपनीचा एक भाग राहतील आणि विलीनीकरण आणि अधिग्रहण विभाग हाताळतील. “त्याच्या नवीन भूमिकेत, शालेव हुलियो कंपनीला नवीन मालक शोधण्यात मदत करण्यास् मदत करतील. नवीन सीईओ शोहत हे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबरोबरच पुनर्रचना प्रक्रिया हाताळतील,” असे अहवालात म्हटले आहे..

रॉयटर्सने देखील पुष्टी केली आहे की कंपनीच्या बोर्डाद्वारे नवीन सीईओची निवड होईपर्यंत शोहत कंपनीचे प्रमुख राहतील.

आंतरराष्ट्रीय मीडिया कन्सोऱ्शीयमने, ज्यामध्ये द वायरचा देखील समावेश होता, पिगॅसस प्रोजेक्ट अंतर्गत खुलासा केला होता की जगभरातील नेते, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी यांचे कॉल इस्रायलच्या एनएसओ ग्रुप कंपनीच्या पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करण्यात आले होते.

१८ जुलै २०२१ पासून, ‘द वायर’सह जगभरातील १७ माध्यम संस्थांनी ५० हजारहून अधिक लीक झालेल्या मोबाइल नंबरच्या डेटाबेसवर हॅक झालेल्या फोन क्रमांकाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

या यादीमध्ये मंत्री, विरोधी नेते, पत्रकार, व्यापारी, सरकारी अधिकारी, हक्क कार्यकर्ते असे ३०० भारतीय नंबर होते. हे स्पष्ट आहे, की एनएसओ ग्रुप हे लष्करी दर्जाचे स्पायवेअर फक्त सरकारांना विकतो. भारत सरकारने पिगॅससची खरेदी नाकारली किंवा पुष्टी केलेली नाही.

हे शोधवृत्त समोर आल्यानंतर देशात आणि जगभरात मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर अमेरिकेने एनएसओ कंपनीला काळ्या यादीत टाकले. यासोबतच अॅपल आणि मेटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी एनएसओ विरोधात खटले दाखल केले आहेत.

एनएसओ कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, की ‘पुनर्रचना प्रक्रिया आणि कर्मचारी कपात पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी केली जात आहे.

एका वर्षापेक्षा कमी कालावधीत राजीनामा देणारे हुलिओ हे दुसरे सीईओ आहेत. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी, तत्कालीन सीईओ इत्झिक बेनबेनिस्टी यांनी त्यांच्या नियुक्तीच्या दोन आठवड्यांच्या आत त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. कंपनीला अमेरिकेने काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांचा हा निर्णय आला होता.

त्यानंतर, या वर्षी जानेवारीमध्ये, एनएसओ समूहाचे अध्यक्ष एशर लेवी यांनी एका इस्रायली दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर, देशातील पोलिसांनी पिगॅसस देखील विकत घेतल्याचा आणि त्याचा नागरिकांविरुद्ध वापर केल्याचा दावा केल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता.

तथापि, लेव्ही यांनी त्यावेळी असे सांगितले होते, की त्यांचा राजीनामा काही महिन्यांपूर्वीच नियोजित होता आणि अलीकडील घटनांशी त्याचा काहीही संबंध नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0