आंग सान सू की यांना ४ वर्षाचा तुरुंगवास

आंग सान सू की यांना ४ वर्षाचा तुरुंगवास

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या व म्यानमारच्या पदच्युत अध्यक्ष आंग सान सू की यांना देशात असंतोष निर्माण करणे व कोविड-१९चे नियम भंग केल्या प्रकरणात न्यायालयाने ४ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. आंग सान सू की यांच्याबरोबर माजी अध्यक्ष विन मिंट यांनाही याच आरोपांखाली ४ वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आलेला आहे.

१ फेब्रुवारीला म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून आंग सान यांचे सरकार सत्तेवरून खाली खेचले होते व लष्करी राजवट घोषित केली होती. त्यानंतर लष्कराने आंग सान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. काही गुन्हे त्यांना आजन्म तुरुंगवास ठोठावणारे आहेत.

आंग सान यांच्यावर बेकायदा वॉकी-टॉकी ठेवणे, सिग्नल जॅमर लावणे व कोविड-१९चे नियम धुडकावण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. आंग यांच्यावर लष्कराचे गोपनीय कायदाचा भंग केल्याचाही आरोप आहे. त्या शिवाय सार्वत्रिक निवडणुकांत भ्रष्टाचार करणे, ६ लाख डॉलर इतकी बेहिशेबी रक्कम बाळगणे, १४.४ किलो सोने बाळगणे अशा स्वरुपाचे आरोप लावण्यात आले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS