कर्नाटक: भाजप आमदाराची महिलेला धमकी

कर्नाटक: भाजप आमदाराची महिलेला धमकी

कर्नाटकातील भाजपचे आमदार आणि माजी मंत्री अरविंद लिंबवली यांनी प्रश्न विचारण्याचा आणि जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला धमकी दिल्याचा आरोप आहे. यचबाबत आमदार कथितपणे एका पत्रकाराला म्हणाले, की 'तुम्ही माझी चौकशी का करत आहात, मी तिच्यावर बलात्कार केला आहे का?'

जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा?
‘आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर’
कलम ३५(अ): जुना राग आळवणे सुरू!

बेंगळुरू: कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री अरविंद लिंबावली हे शनिवारी त्यांच्या महादेवपुरा मतदारसंघातील एका महिलेला धमकावतानाच्या व्हिडिओमध्ये दिसल्याने ते वादात सापडले आहेत.

शहरातील एका जागेवरील अतिक्रमणाबाबत अर्ज करून प्रश्न विचारणाऱ्या महिलेला धमकावल्याचा लिंबवली यांच्यावर आरोप आहे. या कथित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओ क्लिपवरून विरोधी पक्ष काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक काँग्रेस युनिटचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शनिवारी लिंबावलींच्या वर्तनाचा निषेध केला आणि ते म्हणाले की ते आमदार होण्यास पात्र नाहीत. ते म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर राहण्याच्या योग्यतेचे नाही.

कथित घटना शुक्रवारी (२ सप्टेंबर) रोजी घडली, जेव्हा भाजपचे आमदार त्यांच्या मतदारसंघातील काही भागांना भेट देत होते, जेथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी एका महिलेने लिंबवली यांच्याशी संपर्क साधून महादेवपुरा मतदारसंघातील जमिनीवरील अतिक्रमणाबाबत तक्रार पत्र पाहण्याची विनंती केली.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आमदार महिलेला धमकावत आहेत आणि पोलिसांना तिला घेऊन जाण्यास सांगत आहेत. जेव्हा महिलेने नीट बोलण्यास सांगितले, तेव्हा त्यानी सांगितले की तिच्याशी बोलण्यासारखे काहीही नाही कारण ती “अतिक्रमण करणारी” आहे. त्यानंतर आमदाराच्या सूचनेवरून दोन महिला पोलिसांनी महिलेला पोलिस ठाण्यात नेले.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, लिंबवलींनी स्थानिक कार्यकर्त्या रुथ सागर मेरीला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली.

सविस्तर वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0