राज्यातल्या ४ मुलांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’

राज्यातल्या ४ मुलांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील या चौघा मुलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘पंतप्रधा

आसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही
मुलांमधील कोरोना संसर्गः बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
रस्त्यावरील मुले गेली कुठे?

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयंम पाटील या चौघा

शिवांगी काळे

शिवांगी काळे

मुलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले तसेच, प्रातिनिधिक बालकांसोबत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सहा श्रेणींमध्ये देशातील २९ मुलांची ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (६) , पुणे येथील जुई केसकर (१५), मुंबई येथील जिया राय (१३) आणि नाशिक येथील स्वयंम पाटील (१४) या मुलांचा समावेश आहे.  पदक, १ लाख रूपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

जुई केसकर

जुई केसकर

जळगाव येथील शिवांगी काळे हिची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. लहान वयातच धाडस आणि समयसूचकता दाखवत शिवांगीने आपल्या आई व बहिणीचे प्राण विजेच्या धक्क्यापासून वाचवले होते.

पुणे येथील जुई केसकर हिची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास ‘जे ट्रेमर ३ जी’ असे  नाव देण्यात आले आहे.

मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वाटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.

स्वयंम पाटील

स्वयंम पाटील

नाशिक येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंमने वयाच्या १०व्या वर्षी ५ कि. मी. अंतर पोहून तर १३व्या वर्षी १४ कि. मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी कला व संस्कृती, शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा या सहा श्रेणींमध्ये ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’-२०२२ पटकाविणाऱ्या २९ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले. पुरस्कार विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्र प्रदेशातील १५ मुले आणि १४ मुलींचा समावेश होता. या कार्यक्रमातच पंतप्रधानांनी वर्ष २०२१च्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्या  ३२ बालकांना डिजीटल प्रमाणपत्र प्रदान केले.

रिया राय

रिया राय

पुरस्कार विजेत्या बालकांना देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार आयुष्यभर स्मरणात राहणार असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या पुरस्कारासोबत तुम्हा सर्व बालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. मित्र, कुटुंबिय, समाज अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत, तेव्हा या अपेक्षांचे ओझे वाटून न घेता त्यातून प्रेरणा घ्या असेही पंतप्रधान म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0