महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक

महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक

नवी दिल्लीः २०१६मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारुबंदी लागू केली होती व हे राज्य ‘ड्राय स्टेट’ म्हणून ओळखले जात होते. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्

फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता
चंद्रपुरातील दारूबंदी उठवली
सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन

नवी दिल्लीः २०१६मध्ये नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारुबंदी लागू केली होती व हे राज्य ‘ड्राय स्टेट’ म्हणून ओळखले जात होते. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची अधिक विक्री होत असल्याचे दिसून आले आहे.

या सर्वेक्षणात बिहारमधल्या १५.५ टक्के पुरुषांनी आपण दारु पित असल्याची कबुली दिली आहे. बिहारमध्ये ग्रामीण भागात दारु पिण्याचे प्रमाण १५.८ टक्के तर शहरात १४ टक्के आहे. पण ज्या महाराष्ट्रात दारुबंदी नाही तेथे दारु पिण्याचे प्रमाण १३.९ टक्के आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागात दारुची विक्रीही बिहारच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात दारु पिण्याचे प्रमाण १४.७ तर शहरी भागात १३ टक्के आहे.

बिहारमधील महिलाही महाराष्ट्राच्या पुढे

बिहारमध्ये महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण ०.५ टक्के तर महाराष्ट्रात हे प्रमाण ०.४ टक्के आहे. बिहारमध्ये ग्रामीण भागात महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण ०.४ टक्के तर महाराष्ट्रात ०.५ टक्के इतके आहे.

तेलंगणात सर्वाधिक दारुचे सेवन

उदारमतवादी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दारु पिण्याचे प्रमाण ३६.९टक्के आहे पण तेलंगणमध्ये (४३.३ टक्के) गोव्यापेक्षा अधिक दारु प्याली जाते.

देशात दारुपेक्षा तंबाखूचे व्यसन सर्वाधिक आहे. मिझोराममध्ये ७५ टक्के पुरुष व ६५ टक्के स्त्रियांना तंबाखूचे व्यसन आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0