नवी दिल्लीः भारतीय नौदलातील पाणबुड्यांच्या ताफ्यांच्या नूतनीकरणासंदर्भात गोपनीय माहिती चोरल्या प्रकरणात सीबीआयने भारतीय नौदलातील एका कमांडरसह दोन माजी
नवी दिल्लीः भारतीय नौदलातील पाणबुड्यांच्या ताफ्यांच्या नूतनीकरणासंदर्भात गोपनीय माहिती चोरल्या प्रकरणात सीबीआयने भारतीय नौदलातील एका कमांडरसह दोन माजी नौदल अधिकार्यांना अटक केली आहे. सीबीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती. या सर्वांवर कित्येक दिवस सीबीआयचे अधिकारी पाळत ठेवून होते. अटक करण्यात आलेला कमांडर नौदलाच्या पश्चिम विभागात कार्यरत असून त्यांना गेल्या सप्टेंबरमध्ये ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील सर्व ५ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
भारतीय नौदलातील किलो पाणबुडी अनेक वर्षे कार्यरत आहे. या पाणबुडीची बांधणी सोव्हिएट युनियनने केली होती आणि जगभरातील अनेक देशांच्या नौदल ताफ्यात ही आजही कार्यरत आहे.
या पाणबुड्यांना अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. हे काम गोपनीय स्वरुपाचे असते. या कामाची माहिती पाच जणांनी चोरल्याचे लक्षात आले. सध्या सीबीआयकडून फोरेन्सिक तपासण्या सुरू आहेत. गोपनीय माहिती कोण कोणत्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणांमार्फत पुरवली गेली आहे, याचा तपास सुरू आहे. सीबीआयने दिल्ली, मुंबई, हैदराबादसह अन्य १९ ठिकाणी छापे मारून बरेच पुरावे मिळवले आहेत. काही ठिकाणी सीबीआयने डिजिटल पुरावे जमा केले आहेत.
या घटनेची अंतर्गत चौकशी नौदलातील व्हाइस अडमिरल व रिअर अडमिरल यांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. तसेच सीबीआयच्या चौकशीला नौदलाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS