‘इंडिया गेट’वर नेताजींचा भव्य पुतळा होणार

‘इंडिया गेट’वर नेताजींचा भव्य पुतळा होणार

नवी दिल्लीः स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद फौज सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा ‘इंडिया गेट’ येथे लवकरच उभा करण्यात येईल, अशी घ

‘आध्यात्मिक शक्तीकडून चालवले जात होते एनएसई’
३० हजार कोटींचे पॅकेज देत बीएसएनएल व एमटीएनएलचे विलीनीकरण
वादग्रस्त सीएएचे कौतुक : राष्ट्रपतींवर टीका

नवी दिल्लीः स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद फौज सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा ‘इंडिया गेट’ येथे लवकरच उभा करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. नेताजींच्या कार्याला नमन म्हणून हा पुतळा उभा करण्यात येईल. या पुतळ्याचा होलोग्राम २३ जानेवारीला मोदींच्या हस्ते जनतेपुढे उघड केला जाणार आहे.

२३ जानेवारी २०२२ रोजी आझाद हिंद सेनेला १२५ वर्ष पुरी होत आहे. त्याचे औचित्य साधत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नेताजींचा पुतळा ग्रॅनाइटचा असेल, असेही मोदी यांनी सांगितले.

दरम्यान शुक्रवारी इंडिया गेटवरची अमर जवान ज्योत समारंभपूर्वक नव्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीत विलीन करण्यात आली. १९७१च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण कायम राहावे म्हणून इंडिया गेटवर अमर जवान ज्योत निर्माण केली होती. गेली ५० वर्षे ती अखंडपणे धगधगत आहे. ही ज्योत न विझवता ती २०१९मध्ये तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या ज्योतीत विलिन करण्यात आली.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0