‘आज तक’चा अयोध्या निकालावरील कार्यक्रम भडकाऊ

‘आज तक’चा अयोध्या निकालावरील कार्यक्रम भडकाऊ

द नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स ऑथोरिटीने ‘आज तक’ला हा कार्यक्रम सात दिवसांच्या आत यूट्यूबवरून हटवण्यास सांगितले आहे.

यूएईत धार्मिक विद्वेष : तीन भारतीयांचे नोकरीतून निलंबन
त्रिपुरा मुस्लिमविरोधी हिंसाचार: सत्यशोधन पथकातील दोघांवर गुन्हे
‘त्रिपुरा हिंसाचाराचा भाजपने मतांसाठी फायदा करून घेतला’

नवी दिल्ली : ‘आज तक’ या टेलिव्हिजन न्यूज चॅनलने राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी जो कार्यक्रम केला तो धार्मिक धुव्रीकरण करणारा आणि भडकाऊ असल्याची टिप्पणी करत ‘द नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स ऑथोरिटी’ने (NBSA) त्यांना फटकारले आहे. सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस (CJP) यांच्याकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती.

रोहित सरदाना यांनी या चॅनलवर केलेल्या या कार्यक्रमात स्वामी करपत्री या एका पाहुण्यांनी घोषित केले होते, “ १८ नोव्हेंबर रोजी, राम जन्मभूमीच्या निर्मितीला सुरुवात होईल. निकाल निश्चितच आमच्याच बाजूने लागेल.”

यामध्ये NBSA च्या विशेष सल्ल्याचे उल्लंघन झालेले होते. NBSA ने अयोध्या प्रकरणाबाबत बातम्या देताना आणि वादविवाद घेताना विशेष मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे अशा सूचना दिलेल्या होत्या.

NBSA ने आता हा वादग्रस्त कार्यक्रम यूट्यूबवरून काढून टाकावा आणि सात दिवसांच्या आत त्याचा अहवाल द्यावा अशी सूचना केली आहे.

NBSA कारवाईवर समाधान व्यक्त करत CJP सचिव तीस्ता सेटलवाड म्हणाल्या, “हा CJP च्या ‘हेट हटाओ’ मोहिमेचा एक भाग आहे. टीआरपी रेटिंगसाठी वाहवत जाणाऱ्या टीव्ही चॅनलना अनेकदा घटनात्मक सीमारेषेचे भान राहत नाही. CJP टेलिव्हिजन आणि प्रिंटमधील द्वेषपूर्ण चित्रणावर लक्ष ठेवण्याचे काम करत राहील.”

आज तकने १५ ऑक्टोबर रोजी एक भडक ट्वीटही केले होते ज्यात लिहिले होते, “Our [Hindu] land, our Ram, where did the mosque come from? (आमची (हिंदू) जमीन, आमचा राम, यात मशिदीचे काय काम?)”

मात्र NBSA ने यूट्यूबवरील कार्यक्रमाबाबत भाष्य केले असले तरी या ट्वीटबद्दल चौकशी केली नाही कारण समाजमाध्यमांवरील द्वेषपूर्ण मजकूर हे त्यांच्या न्यायक्षेत्रात येत नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0