पटनाः बिहारच्या मुख्यमंत्री सलग चौथ्यांदा नितीश कुमार सोमवारी शपथविधी घेणार आहेत. रविवारी पटना येथे एनडीए घटक दलांची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार
पटनाः बिहारच्या मुख्यमंत्री सलग चौथ्यांदा नितीश कुमार सोमवारी शपथविधी घेणार आहेत. रविवारी पटना येथे एनडीए घटक दलांची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार यांना सर्वसंमतीने मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यावर सहमती झाली. उपमुख्यमंत्रीपदी मात्र सुशील कुमार मोदी यांचे नाव येण्याची शक्यता होती पण तसे ते आले नाहीत. भाजप आपला नवा चेहरा या पदावर आणणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी नितीश कुमार यांनी विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती व मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
सोमवारी संध्याकाळी ४.३० वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
रविवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या एनडीएच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, हिंदुस्तान अवामी मोर्चाचे जीतन राम मांझी, विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश सहानी आदी नेते उपस्थित होते.
या बैठकीत भाजपाचे नेते तारकेश्वर प्रसाद यांना विधानसभेतील पक्षाचे संसदीय नेते व रेणु देवी यांना उपनेते म्हणून घोषित करण्यात आले.
एनडीएच्या बैठकीपूर्वी जेडीयूची बैठक झाली होती. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान नितीश कुमार यांच्या या निवडीवर आरजेडीचे नेते मनोझ झा यांनी लक्ष्य करत केवळ ४० जागा मिळवलेल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्रीपद कसे स्वीकारू शकतो असा सवाल केला. जनतेने नितीश कुमार यांच्याविरोधात मतदान केले आहे. त्यांना मुळातच जनमत देण्यात आलेले नाही. बिहारच्या जनतेला पर्यायी नेतृत्व लवकरच मिळेल. यासाठी आठवडा वा महिना लागेल पण त्यांना नवे नेतृत्व मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मूळ बातमी
COMMENTS