नवी दिल्लीः तीन शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सरकार व संसदेला अत्यंत आदर असून हे आंदोलन पवित्र आहे. पण हे तीन कायदे आले तरी कृ
नवी दिल्लीः तीन शेती कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सरकार व संसदेला अत्यंत आदर असून हे आंदोलन पवित्र आहे. पण हे तीन कायदे आले तरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद केल्या जाणार नाहीत, किमान हमीभाव चालू राहणार आहे ती व्यवस्था बंद केली जाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनपर भाषणात मोदींनी शेतकर्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, चर्चेस यावे, असे पुन्हा आवाहन केले. सरकार कायद्याच्या प्रत्येक तरतुदीवर चर्चा करण्यास तयार आहे, त्यात त्रुटी आढळून आल्यास कायद्यात बदल करण्यात येतील असेही ते म्हणाले. मोदींचे भाषण सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सभात्याग केला.
मोदींनी आपल्या भाषणात, तीन शेती कायद्यांमुळे शेतकर्यांना नवी व्यवस्था बंधनकारक नसेल ते जुन्या व्यवस्थेतही आपल्या शेतमालाची खरेदी विक्री करू शकतात, असेही स्पष्ट केले. विरोधक या कायद्यांविषयी अप्रचार पसरवत असून ते खेळ बिघडवण्याचे काम करत असल्याची शाब्दिक कोटी त्यांनी केली. संसदेचे कामकाज होऊ नये याची शिस्तबद्ध योजना विरोधकांनी आखली आहे, असाही त्यांनी आरोप केला. शेतकर्यांचे भले करण्याचा आमचा उद्देश चांगला आहे, त्याची फळेही चांगली येतील. लाखो प्रश्न असतील तर त्याला अब्ज उत्तरे मिळतात अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
शरद पवार यांच्यावर निशाणा
मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्यास सुरूवात केली होती. शेतकरी आपला शेती माल थेट बाजारात विकू शकेल, कंत्राट पद्धतीने त्याला शेती करता येईल, खासगी बाजार व्यवस्था व ग्राहक ते शेतकरी असे थेट ई-ट्रेडिंगची सुरूवात होईल असे ते म्हणाले होते. आणि तशा तरतुदीही कायद्यात करण्यात आल्या होत्या. २४ खासगी बाजारपेठा तयार झाल्या आहेत असे ते सांगत होते, तेच आता एकदम उलटी भाषा करत आहेत, शेतकर्यांमध्ये संभ्रम करत आहेत, असा आरोप मोदींनी केला.
मूळ बातमी
COMMENTS