निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर

निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर

नवी दिल्लीः राज्यसभेतल्या १२ निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची लढाई आता रस्त्यावर दिसून आली. सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वा

भाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले
‘शेवटी माझे नाव तर स्टॅलिनच आहे!’
भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका

नवी दिल्लीः राज्यसभेतल्या १२ निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची लढाई आता रस्त्यावर दिसून आली. सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेतील म. गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकपर्यंत एक निषेध मोर्चा काढला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी १२ खासदारांचे निलंबन म्हणजे लोकांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका केली.

१२ खासदारांना इतका काळ निलंबित करण्यामागचे कोणतेही कारण सयुक्तिक वाटत नाही. गेले दोन आठवडे हे खासदार संसदेच्या बाहेरच धरणे धरून बसले आहेत, त्यांचा आवाजच दाबण्याचा हा प्रयत्न असून त्यांनी काय चूक केली असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला.

मोदी सरकार कोणतेही विधेयक संसदेत चर्चेत न आणता संमत करत आहे. जनतेच्या हिताच्या विधेयकांवर संसदेत वादविवाद, चर्चा होत नाही. अशी लोकशाही चालवली जात नाहीत. असे करणे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार असल्याची टीकाही गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी यावेळी शेतकरी आंदोलन, त्यांच्या मागण्या, लखीमपुर खेरी प्रकरणाचाही उल्लेख केला. एक मंत्री शेतकर्यांना ठार मारतो. पंतप्रधानांना हे सर्व काही माहिती असते. देशातले दोन-तीन धनिक शेतकर्यांच्या विरोधात आहेत. १२ खासदारांना पंतप्रधान वा राज्यसभेच्या सभापतींनी निलंबित केलेले नाही तर या धनिक भांडवलदारांनी केले आहे. या भांडवलदारांना शेतकर्याच्या संपत्तीवर डल्ला मारायचा आहे. हे पंतप्रधान व सभापतींना माहिती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित

या मोर्चाला अनेक राजकीय पक्षांचे नेते होते. यात शिवसेनेचे संजय राऊत, द्रमुकचे तिरुची सिवा, तृणमूलचे सुगाता रॉय, राजदचे मनोज झा, माकपचे इलाराम करीम आदी नेते होते.

या प्रसंगी द्रमुकचे सिवा म्हणाले, सरकारचा हेतूच मुळात लोकशाहीविरोधी व राज्यसभेच्या सर्व नियमांचा भंग करणारा आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर सरकारने तीनही कायदे मागे घेतले. त्यावर चर्चा केली नाही. विरोधी पक्षांना त्यांचे मत, बाजू मांडू दिली नाही.

दरम्यान संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकार निलंबित प्रत्येक खासदाराशी चर्चा करत असल्याचा दावा केला. निलंबित खासदारांनी आपल्या वर्तनाबाबत केवळ खेद व्यक्त करावा असे आमचे सांगणे आहे, असे ते म्हणाले.

शरद पवार-सोनिया गांधी भेट

१२ खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सर्व विरोधक एकत्र येत असताना मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, द्रमुकचे टीआर बालू, माकपचे नेते सीताराम येचुरी व यूपीए घटक दलातील काही नेते होते. या बैठकीला तृणमूल काँग्रेसला बोलावण्यात आले नव्हते.

या बैठकीत निलंबित सदस्यांच्या मुद्द्यांवर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा करावी असे ठरल्याचे समजते.

या बैठकीबाबत संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, ही बैठक पूर्वनियोजित होती. या पुढेही बैठक होईल. अनेक बाबी आताच  सांगता येत नाहीत.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0