‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीत दाखल

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ कळंबोलीत दाखल

अलिबाग: राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभू

‘सोना अलॉयज्’मधून रोज १०-१५ टन प्राणवायू मिळणार
‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविद-१९’
राज्यात ४३ दिवसांत ७६ हजार लहान मुलांना कोरोना

अलिबाग: राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ४५ मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या ३ टँकरसह ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोली येथे दाखल झाली.

विशाखापट्टणम् येथून वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेलमधील कळंबोली येथून १० ट्रकची “ऑक्सिजन एक्स्प्रेस” १९ एप्रिल २०२१ला रवाना करण्यात आली होती. मंगळवारी ही “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोलीमध्ये दाखल झाल्यामुळे कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी सायंकाळी ६.०० वाजता जामनगर येथून निघालेली ही एक्सप्रेस मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.

जामनगर येथून निघालेल्या या “ऑक्सिजन एक्सप्रेस”मधील १० टँकरपैकी ३ टँकर हे नागपूर येथे, ४ टँकर हे नाशिक येथे आणि उर्वरित ३ टँकर हे कळंबोली, पनवेल येथे उतरविण्यात आले.

नाशिक येथे उतरविण्यात आलेल्या टँकरमधील वैद्यकीय लिक्विड ऑक्सिजन नाशिकसह, अहमदनगर आणि इतर परिसरातील गरजू रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. तर कळंबोली येथे आलेले टँकर्स रिलायन्स जामनगर येथून आलेले आहेत. प्रत्येकी १५ मेट्रिक टन असे एकूण ४५ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे टँकर्स उच्चस्तरीय समितीमार्फत रवाना करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील २ टँकर हे मुंबईसाठी तर १ टँकर पुण्यासाठी रवाना करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये पाठविण्यात येणाऱ्या टँकरपैकी एक टँकर सेव्हन हिल रुग्णालयासाठी तर दुसरा रबाळे, नवी मुंबईसाठी पाठविण्याचे नियोजन आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: