‘ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे योग्य नियोजन होईल’

‘ऑक्सिजन, रेमडेसिवीरचे योग्य नियोजन होईल’

मुंबई: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभा

कोविड आरटीपीसीआर चाचण्या, लसीकरण वाढवण्याचे निर्देश
कोविड-१९- तिसरी लाट रोखण्याच्या सूचना जाहीर
‘आम्ही गरीब माणसं…आम्हाला कोण विचारतं?’

मुंबई: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी दिली.

मेडिकल ऑक्सिजनचे समप्रमाणात वितरण

महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. या व्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १,२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे, अशी माहिती शिंगणे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १,७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटक व गुजरात राज्यांमधून २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस २४ एप्रिलला १०५ टन ऑक्सिजन घेऊन आली. राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचे ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यन्त ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे शिंगणे म्हणाले.

२७ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात एकूण १,५५६ टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

 रेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ. रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. ही कंपनी उत्पादन करते.

वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0