चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी

चिदंबरम यांच्या अटकेची ईडीलाही परवानगी

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सध्या सीबीआय कोठडीत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी व गरज वाटल्यास त्यांना ईडीने अटक करण्यास हरकत नाही असा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला.

पी. चिदंबरम हे येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडीत आहे. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना ईडी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते.

दरम्यान मंगळवारी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी नव्याने अर्ज केला. आपल्याला केवळ अपमानित करण्यासाठी सीबीआय तुरुंगात ठेवू इच्छित आहे असा आरोप त्यांनी केला. आपल्या विरोधात कोणताही आरोप नाही व कोणत्याही साक्षीदारावर आपण व आपल्या कुटुंबाने दबाव आणलेला नाही असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS