पाकिस्तानकडून ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी

पाकिस्तानकडून ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची चाचणी

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘गझनवी’ या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने गुरुवारी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र २९० किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते

काश्मीरातील कोरोना लसीकरण मोहीम सुस्तावली
एका मुस्लिमाला अशोक चक्र मिळते तरी भाजपासाठी समस्त मुस्लिम देशशत्रूच !
काश्मीरातील पर्यटन व्यवसाय ठप्प

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘गझनवी’ या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने गुरुवारी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र २९० किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. या चाचणीची अधिकृत घोषणा पाकिस्तानच्या लष्कराने केली असून पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्कराचे चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे.

जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान जो तणाव निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही क्षेपणास्त्र चाचणी घेतली. ही चाचणी घेण्यापूर्वी पाकिस्तानने कराचीवरून जाणा हवाई मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत बंद केला आहे.

गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यामागचे एक कारण काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा आहे. ५ ऑगस्टला जम्मू व काश्मीरचे ३७० कलम भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तांना भारतात जाण्यास सांगितले होते व राजनैतिक संबंध तोडले होते. पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध, बस व रेल्वेसेवाही बंद केली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0