परमबीर यांची याचिका फेटाळली

परमबीर यांची याचिका फेटाळली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिक

कायद्याकडून मानवाधिकाराची पायमल्ली
संघराज्य संबंधांना आव्हान देणारे एनआयए
भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार देत उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

गृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेद्वारे केली होती.

परमबीर सिंह यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता.

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केले नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांचे वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली.

याचिकेत परमबीर सिंह यांनी आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्दतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली झाल्याचे त्यांनी म्हंटले होते. अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले होते.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचं म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु, असे सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरण ‘एनआयए’कडे ?

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार ‘एनआयए’ने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. ‘एनआयए’ची तक्रार मान्य करून सत्र न्यायालयाने हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करण्याचे एटीएसला आदेश दिले.

या प्रकरणामध्ये मुख्य संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने यापूर्वीच मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे.

मंगळवारी महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्हा केल्याचे सांगितले होते. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असे देखील एटीएसकडून सांगण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: