मुसलमान कैद्याच्या पाठीवर हिंदू प्रतिकाचा डाग उमटवणे हे काही पवित्र कृत्य नाही. तर सांप्रदायिक वर्तन आहे. अशा पद्धतीने अधिकारांचा गैर/वापर करून एखाद्याला डागाळणे हा वर्चस्व गाजवण्याचा प्रकार असतो.
“ओम म्हणजे हजारो गोष्टी. त्यापैकी एक म्हणजे देवतांच्या निवासस्थानात आपले स्वागत होणे!” – आर्य समाज मंदिरात एका मित्राने या ओळींकडे माझे लक्ष वेधले. दहाएक वर्षांपूर्वीची गोष्ट. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधल्या माझ्या हरियाणातल्या मित्राचे लग्न होते. त्याची प्रेयसी बंगाली होती. दोन्हीकडच्या पालकांना त्यांचे आंतरजातीय लग्न मान्य नव्हते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नाचा निर्णय झाला होता.
या समाजात कौटुंबिक आणि धार्मिक परंपरांचे सोहळे पिढ्यानपिढ्या साजरे केले जातात. परंतु तो उत्सव खरंतर असतो पुरुषप्रधानतेचा, जातीय समीकरणांचा आणि आर्थिक हितसंबधांचा! तिथे प्रेमाला किंमत काय असणार? विद्यापीठातले आम्ही काही मित्रच फक्त त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला त्यावेळी उपस्थित होतो. त्या छोटेखानी लग्न सोहळ्यात असताना वरचे वाक्य मित्राने दाखवले.
मी एका हिंदू कुटुंबात वाढलो आहे त्यामुळे ते प्रतीक मला माहित होते. ते अक्षर देवासमोर ठेवलेल्या एका तांब्याच्या छोट्या कलशावर लाल अक्षरात लिहिलेले असायचे. कलशावर पाण्यात बुडवलेल्या दुर्वा असायच्या. या दुर्वांना पुढील बाजूला तीन गवताची पाती असायची. ही तीन पाती हिंदूंसाठी त्रिशूलाचे प्रतीक आहे.
ओमकराचा जप, मी हळू हळू शिकलो. हा आदिम ध्वनी आहे. शब्दांमधलाही पवित्र शब्द आहे. ओमकाराचा उच्चार कुठल्याही मंत्रपठणाआधी केला जातो. ऋग्वेदच्या अत्रेय ब्राह्मणांमध्ये या शब्दाला वैश्विक महत्व आहे. हा शब्द म्हणजे, विश्वाला मानवाच्या मुक्त आत्म्याशी जोडणारे, ‘प्राणवायू, जीवन व अस्तित्वात असलेल्या सगळ्याशी’ बांधणारे मूलतत्व आहे.
तिहार तुरुंगातील मुसलमान कैद्याच्या पाठीवर ज्या हिंस्त्र पद्धतीने ओम चिन्हाचा डाग उमटवला गेला आहे, तो फोटो बघून मी मुळातून पार हादरून गेलो आहे. या कैद्याचे नाव नब्बीर असून तो कच्चा कैदी (under trial) आहे. नब्बीरला दोन दिवस उपाशी ठेवले गेले आणि १२ एप्रिलला त्याच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने त्याला डाग देण्यात आला. हा सगळा प्रकार कारागृह अधीक्षकांनीच केल्याचे समजते. ही फक्त एक भयंकर घटना नाहीये, तर हे कृत्य करणाऱ्या दोषींना वेळीच कायद्याने शिक्षा झाली नाही तर माणसांचा छळ आणि अपमान करण्याची ही अतिरेकी सांप्रदायिक विकृती फोफावायला वेळ लागणार नाही. हिंदू नसणाऱ्या व्यक्तीचे वर्गीकरण करून त्यांचा बळी घेण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे.
या प्रकरणात पुढे काय काय घडत आहे यावर लक्ष देणे आवश्यक आहे. अधिकारांचा वापर करून भीती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुस्लिम कैद्याचे शरीर चिन्हांकित केल्याने त्या कैद्याच्या शरीराचे पावित्र्य, स्वतःच्या शरीरावर असणारा हक्क, सार्वभौमत्व ओरबाडून घेतले गेले. येथे सार्वभौमत्व राजकीय आणि धार्मिक अर्थाने अपेक्षित आहे. हिंदू प्रतिकाने त्याचे शरीर चिन्हांकित केल्यामुळे त्याच्या शरीराच्या पावित्र्याचे उल्लंघन झाले आहे. धर्मातील पवित्र प्रतिकांना राजकीय आखाड्यात उतरवण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे. कच्चा कैदी म्हणून त्याच्याकडे राजकीय हक्कांची कमतरता आहेच शिवाय ‘मानवी हक्क’ही त्याच्याकडे नाहीत.
मानवी धरणांच्या चौकटीत ‘माणूस’ म्हणजे नक्की काय? तर, आंतरिक पातळीवर परमेश्वराशी जोडलेली व्यक्ती. हे एका निराळ्या पातळीवरचे अध्यात्मिक नाते आहे. जिथे राजकीय शक्तींना स्थान नसते आणि त्यांचे नियंत्रणही अपेक्षित नसते.
आपल्या कैद्यांवर अधीक्षकाने मर्यादा ओलांडून जे अधिकार त्याच्याकडे नाहीत ते वापरत आपणच सर्वेसर्वा आहोत हे अतिशय हिंस्त्र पद्धतीने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुसलमान कैद्याच्या पाठीवर हिंदू प्रतिकाचा डाग उमटवणे हे काही पवित्र कृत्य नाही. तर सांप्रदायिक वर्तन आहे. अशा पद्धतीने अधिकारांचा गैर/वापर करून एखाद्याला डागाळणे हा वर्चस्व गाजवण्याचा प्रकार असतो. त्या कैद्याच्या परिचित धारणांशी संबंधित नसलेले, परके प्रतीक त्याच्या खांद्यावर चिन्हांकित करणे म्हणजे त्याचा अपमान करणे आहे. ते प्रतीक सांप्रदायिक अभिव्यक्तीचे माध्यम बनले असून मूळ गाभ्यापासूनच दूर गेलेले आहे.
तिहार तुरुंगात जे काही झाले ते क्रूर आहे. जेव्हा सारे काही संदर्भहीन होते तेव्हा पवित्र्य चिन्हाचे भयावह प्रतिक बनते. प्रतिकांचे विकृतीकरण होते. पावित्र्याची घसरण ‘बुक ऑफ रेव्हलेशन’ मध्ये ज्याचा उल्लेख ‘द मार्क ऑफ बिस्ट’ म्हणून केला गेला आहे तशी होते. (Revelation 13:16-17 16 )
तुमचा आत्म्यावर विश्वास असो की नसो, हे जग चालवणाऱ्या शक्तीशी आत्मा जोडलेला असतो. माणसांना माणूस म्हणून सन्मानाने जगू न देण्यासाठी सर्व प्रकारच्या रानटी आणि हिंसक प्रवृत्ती आत्म्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नरत असतात. आत्म्याची अवहेलना करण्याचा प्रयत्न करत असतात.
जर्मनीतही १९३८मध्ये ज्यू कैदींना पिवळ्या ताऱ्याच्या प्रतिकाने चिन्हांकित केले गेले, जे डेव्हिड ज्यू स्टारचे विकृत रूप होते. इतिहासाची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा ती फक्त त्रासदायक किंवा हास्यास्पद असते असे नाही तर काही काही वेळा अतिशय भयावह असू शकते.
मनष फिराक भट्टाचार्जी हे लेखक आहेत.
COMMENTS