नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून खून, बलात्कार, भ्रष्टाचार आणि किरकोळ गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ६०० हू
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून खून, बलात्कार, भ्रष्टाचार आणि किरकोळ गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ६०० हून कैद्यांची सुटका केली जाणार आहे. अशा कैद्यांची यादीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून तयार केली जात असून लवकरच ती प्रसिद्ध होणार आहे.
म. गांधींच्या १५० जयंतीनिमित्ताने अनेक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी २ ऑक्टोबर २०१८ व ६ एप्रिल २०१९रोजी १,४२४ कैद्यांची सुटका केली होती. आता तिसऱ्या टप्प्यात येत्या २ ऑक्टोबरला ६०० हून अधिक कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
ज्या महिला कैद्यांचे वय ५५ किंवा त्याहून अधिक आहे आणि ज्या पुरुषांचे वय ६० व त्याहून अधिक आहे आणि त्यांनी त्यांची अर्धी शिक्षा पुरी केली असेल अशा कैद्यांना प्राधान्य देणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS