इस्राइली स्पायवेअरचा व्हॉट्सॅप गौप्यस्फोट

इस्राइली स्पायवेअरचा व्हॉट्सॅप गौप्यस्फोट

लोकांचे फोन हॅक करण्यासाठी गुप्तहेरांना मदत केल्याबद्दल व्हॉट्सॅपने इस्राइली फर्मवर दावा ठोकला आहे. त्यामुळे हा रहस्यभेद झाला आहे.

वाढत्या हिंदुत्वाबरोबर काश्मीरप्रश्न चिघळत गेला!
‘राह्यनोसर्स’ – युजीन आयनेस्को
शेती कायदे मागे; पंजाबमध्ये काय घडू शकेल?

इस्राइली स्पायवेअर – पेगॅससचा उपयोग करून भारतीय कार्यकर्ते आणि पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. इंडियन एक्स्प्रेसने  प्रथम दिलेल्या बातमीनुसार किमान दोन डझन अभ्यासक, मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांना स्वतः व्हॉट्सॅपद्वारे हे सांगण्यात आले, की मेमध्ये दोन आठवड्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या फोनवर काय चालू आहे त्याचे निरीक्षण केले जात होते.  लोकांचे फोन हॅक करण्यासाठी गुप्तहेरांना मदत केल्याबद्दल व्हॉट्सॅपने इस्राइली फर्मवर दावा ठोकल्यानंतर हा रहस्यभेद झाला आहे.

कोणाकोणाच्या फोनवर पाळत ठेवली गेली त्या व्यक्तींची संख्या किंवा नावे जाहीर करण्यास व्हॉट्सॅपने नकार दिला असला तरी ही संख्या लक्षणीय असल्याचे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले.

इस्राइली फर्म, एनएसओ ग्रुपने आरोप फेटाळले आहेत. आपले तंत्रज्ञान मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या विरोधात काम करण्यासाठी डिझाईन केलेले नाही असे या फर्मने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कॅनडास्थित सायबर सुरक्षा संस्था सिटिझन लॅबने सप्टेंबर २०१८ मध्ये म्हटले होते, “४५ देशांमध्ये आम्ही अभ्यासलेल्या ३६ पेगॅसस ऑपरेटरपैकी ३३ जणांकडे आम्हाला संशयित एनएसओ पेगॅसस इन्फेक्शन आढळून आले.”

ज्याच्यावर हेरगिरी करायची त्या व्यक्तीला एका ‘एक्स्प्लॉइट लिंक’ वर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यामुळे ऑपरेटरला सुरक्षा भेदून, फोनमालकाला माहिती न होता व त्याच्या परवानगीशिवाय फोनवर पेगॅसस इन्सटॉल करता येते. त्यानंतर लक्ष्यित व्यक्तीचा सर्व खाजगी डेटा पाहिला जाऊ शकतो, ज्यामध्ये पासवर्ड, काँटॅक्ट याद्या, कॅलेंडरमधील नोंदी, टेक्स्ट संदेश आणि लोकप्रिय मोबाईल मेसेजिंक ऍप्समधील लाईव्ह व्हिडिओ कॉल  यांचा समावेश होतो. फोनचा कॅमेरा किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर चालू करणेही शक्य असते.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, नवीन आवृत्तीमध्ये लिंकही क्लिक करणे गरजेचे नसू शकते. केवळ एका मिस्ड व्हिडिओ कॉलमुळेही हे स्पायवेअर इन्स्टॉल केले जाऊ शकते.

भारतामध्ये ज्या कार्यकर्ते, वकील व पत्रकारांना लक्ष्य करण्यात आले, व सिटिझनलॅब संशोधक आणि व्हॉट्सॅपद्वारे ज्यांना संपर्क करण्यात आला त्यापैकी बहुतांश लोक भीमा कोरेगाव विवाद तसेच इतर दलित मुद्द्यांशी निगडित आहेत.

निहालसिंग राठोड

निहालसिंग राठोड

जून २०१८ पासून भीमा कोरेगाव प्रकरणी नऊ कार्यकर्ते आणि वकीलांना अटक करण्यात आली आहे. नागपूरमधील मानवाधिकार संबंधित काम करणारे वकील निहालसिंग राठोड हे या प्रकरणी आरोपींची बाजू लढवणाऱ्या वकीलांपैकी एक आहेत. त्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक सुरेंद्र गडलिंग हे यूएपीए कायद्याखाली अटक झालेल्या नऊ कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.

मागील दोन वर्षांमध्ये राठोड यांना अनोळखी क्रमांकांवरून अनेकदा व्हॉट्सॅप कॉल येत असत. हे कॉल आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येत आणि ते नेहमी ग्रुप कॉल असत. कॉलला उत्तर दिले असता ते डिसकनेक्ट होत. हे चुकून त्यांच्या फोनवर येणारे निरुपद्रवी कॉल असावेत असे त्यांना वाटले, मात्र खबरदारी म्हणून त्यांनी हे सर्व व्हॉट्सॅपला “संशयित कॉल” म्हणून कळवले.

रुपाली जाधव

रुपाली जाधव

राठोड यांना त्यानंतर सिटिझन लॅबमधील एका संशोधकाने संपर्क केला व त्यांचा त्यांना “विशिष् स्वरूपाची डिजिटल जोखीम”.असू शकते असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॅपकडूनही खालील स्वरूपाचा एक संदेश प्राप्त झाला.

“मेमध्ये आम्ही एक सायबर हल्ला परतवला, ज्यामध्ये एका आधुनिक सायबर ऍक्टरने आमच्या व्हिडिओ कॉलिंगचा आमच्या वापरकर्त्यांच्या फोनवर मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी उपयोग केला. हा फोन क्रमांकही त्याची शिकार झालेला असू शकतो आणि आम्ही ही खात्री करू इच्छितो, की आपला फोन सुरक्षित कसा ठेवायचा ते आपल्याला माहित आहे.” याबरोबरच त्यांच्या फोनवर सुरक्षा उपाय कसे करायचे यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. या संदेशात पेगॅससचा काही उल्लेख नव्हता. मात्रद वायरने स्वतंत्रपणे याची पुष्टी केली की

आनंद तेलतुंबडे

आनंद तेलतुंबडे

ज्या लोकांना पेगॅससद्वारे लक्ष्य करण्यात आले असल्याचे व्हॉट्सॅपला समजले त्या सर्वांना त्यांनी असाच संदेश पाठवला होता.

राठोड यांच्याप्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित आणखी दोन वकिलांना, तसेच गडलिंग यांची पत्नी मीनल गडलिंग यांनाही असेच कॉल आले होते. पुणे येथील सांस्कृतिक आणि जातीयवाद विरोधी कार्यकर्ती रुपाली जाधव यांनाही व्हॉट्सॅप आणि सिटिझन लॅब यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी असे संदेश प्राप्त झाले आहेत. दलित अधिकार कार्यकर्ते व छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील एक वकील देगरी प्रसाद चौहान यांनीही त्यांना व्हिडिओ कॉल, तसेच सिटिझन लॅब व व्हॉट्सॅपकडून स्पायवेअर हल्ल्याबद्दल माहिती देणारे संदेश प्राप्त झाल्याचे द वायरला सांगितले. मानवाधिकार कार्यकर्ती वकील बेला भाटिया यांनीही आपल्याला सिटिझन लॅबकडून संदेश मिळाल्याचे सांगितले. अशाच प्रकारे सायबर हल्ल्याची शिकार झालेल्या इतर लोकांमध्ये प्रा. आनंद तेलतुंबडे आणि मानवाधिकार वकील शालिनी गेरा यांचा समावेश असल्याचे समजते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0