‘कबीर कला’च्या रूपालीचा फोन रडारवर

‘कबीर कला’च्या रूपालीचा फोन रडारवर

सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पुण्यातील रुपाली जाधव या कार्यकर्तीच्या फोनवर नजर ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

भारताचे नवे सरन्यायाधीश यू. यू. लळित
आता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार ?
स्व-प्रतिकार रोग झालेला देश

भारतातील विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते, दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर लोकसभा निवडणुकीपासून पाळत ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. फेसबुकच्या मालकीच्या इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनेच हा आरोप केला आहे. सायबर हेरगेरीच्या या प्रकाराविरुद्ध व्हॉट्सअॅपने इस्त्रायलच्या ‘एनएसओ या तंत्रज्ञान समूहावर आरोप करून अमेरिकेमध्ये हा खटला भरला आहे. त्यामध्ये पुण्यातील रुपाली जाधवचा समावेश आहे.

जेधे महाविद्यालयात शिकलेली आणि ‘कबीर कला मंच’ची सक्रीय कार्यकर्ती असणाऱ्या रुपाली जाधवला २८ सप्टेंबरला सिटीझन लॅबमधून रूपालीला फोन आला आणि तिचा फोन नजरेखाली असल्याचे तिला समजले.

टोरांटो येथील टोरांटो विद्यापीठाच्या ‘मंक स्कूल ऑफ ग्लोबल अफेअर्स अॅन्ड पब्लिक पॉलिसी’ या आंतरविद्याशाखीय प्रयोगशाळेने या प्रकरणाचा छडा लावला. जगभरातील मानवी हक्क कार्यकर्त्यांना कसे छळले जात आहे, यावर या संस्थेचे लक्ष असते. या प्रयोगशाळेतर्फे सप्टेंबर महिन्यात अनेक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष संपर्क साधून सावध केले. याच प्रयोगशाळेतील जॉन नावाच्या व्यक्तीने रुपालीशी २८ सप्टेंबरला संपर्क साधला.

रुपाली म्हणाली, “२८ तारखेला जॉन स्कॉटने फोन केला आणि सांगितले, की आम्ही काही दिवसांपासून सर्वेक्षण करीत असून, तुम्ही त्रासात आहात, असे आम्हाला समजले. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, की आम्ही अचानक असा कसा फोन केला. कदाचित तुम्हाला हा फोन कॉल खोटा सुद्धा वाटू शकेल.”

रूपालीला वाटले आपला फोन कशाला कोण हॅक करेल. रुपालीने एका मैत्रिणीच्या मदतीने त्यांना सांगितले, की तिचा विश्वास बसत नाहीये. प्रयोगशाळेतर्फे जॉनने तिला एक व्हिडीओ पाठवला. मग त्यांच्याशी संवाद सुरु झाला पण वेळेचे व्यस्त गणित आणि रुपालीची कामे म्हणून अजून पुढ बोलणे झाले नाही.

जॉन स्कॉटचा मेसेज

जॉन स्कॉटचा मेसेज

३० ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपनेच रूपालीला संपर्क केला आणि तिचा फोन हॅक करण्यात आल्याची तिला माहिती दिली आणि मालवेअर फोनमध्ये घुसल्याने संपूर्ण फोनच बदलण्याची सूचना केली.

ती कविता करते, गाणी गाते, स्टेजवर सादरीकरण करते, फेसबुकवर लिहिते. तिची राजकारणाची समज चळवळीतून आलेली आहे. वर्ग-जात संघर्ष, इथली व्यवस्था याची तिला उत्तम जाण आहे. मग तिच्या फोनवर नजर ठेवायचे कारण काय?

रुपाली म्हणाली, “मी ‘वंचित बहुजन आघाडी’चे फेसबुक पेज, ‘कबीर कला मंच’चे फेसबुक पेज आणि भीमा-कोरेगाव संदर्भातील फेसबुक पेज चालवते आणि शोषितांच्या हक्कासाठी लिखाण करते.”

“माझ्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार लोकांवर का नजर ठेवली जात आहे. आम्ही अतिशय सामान्य लोक आहोत. माझ्यापासून काय धोका आहे” असा सवाल रुपालीने केला.

‘द वायर मराठी’शी बोलताना ती म्हणाली, की घटनेमध्ये जे खाजगीपणा जपण्याचे कलम आहे, त्याचे काय झाले. या व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या कंपन्या स्वतः कोणतीही सुरक्ष का पुरवत नाही. उद्या कोणीही उठून कोणाच्याही फोनमध्ये डोकाऊ लागेल. ही लोकशाही आहे, की अजून काही.

फोनवर नजर ठेवण्याचा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या काळात २० एप्रिल ते १० मे या कालावधीत करण्यात आला, पण अजूनही तो पुढे आत्तापर्यंत सुरु होता का, हे स्पष्ट झालेले नाही.

व्हॉट्सअॅपने हा सायबर हेरगिरीचा प्रकार असल्याचे नमूद करून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये

व्हॉटसअॅपचा मेसेज

व्हॉटसअॅपचा मेसेज

न्यायालयात खटला दाखल केला आहे. इस्त्रायलमधील ‘एनएसओ’ (NSO) या कंपनीने ‘पीगॅसस’ नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करून १४०० मोबाइलमध्ये धोकादायक मालवेअर घुसवले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले, जवळपास जगातील किमान 100 मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार आणि महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती चोरुन त्यांच्यावर पाळत ठेवली आहे. इस्राइलच्या कंपनीने आरोप फेटाळले आहेत.

रुपालीसह, आनद तेलतुंबडे, इला भाटीया, शालिनी गेरा, निहालसिंग राठोड यांच्यासह अनेक पत्रकार, कार्यकर्ते आणि प्राध्यापकांवर नजर ठेवण्यात येत होती. इस्त्रायलमधील ‘एनएसओ’ (NSO) या कंपनीने हे तंत्रज्ञान अनेक सरकारांना विकल्याचे मान्य केले आहे.

या हेरगिरी प्रकाराने जगभरामध्ये खळबळ माजली आहे. यामागे कोण आहे, याचा अजून उलगडा झालेला नाही. मात्र या प्रकाराने आत्तापर्यंत सुरक्षित समजले व्हॉटसअप सुरक्षित नसून, त्यावर नजर ठेवता येऊ शकते. हे पुढे आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0