पिगॅससः याचिकाकर्त्यांचे फोन जमा करण्याचे आदेश

पिगॅससः याचिकाकर्त्यांचे फोन जमा करण्याचे आदेश

नवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरी प्रकरणात चौकशीची मागणी करणार्या याचिकाकर्त्यांचे मोबाइल फोन फोरेन्सिक तपासणीसाठी जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या च

इराणने चाबहार प्रकल्पातून भारताला वगळले
भारतबंद संमिश्र प्रतिसाद, रेल्वे सेवेवर मात्र परिणाम
बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे

नवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरी प्रकरणात चौकशीची मागणी करणार्या याचिकाकर्त्यांचे मोबाइल फोन फोरेन्सिक तपासणीसाठी जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीने दिले आहेत. या याचिकाकर्त्यांना चौकशी समितीने एक इमेल पाठवला असून नवी दिल्लीत याचिकाकर्त्यांनी आपले फोन फोरेन्सिक तपासणीसाठी जमा करावेत असे सांगण्यात आले आहे. हे फोन नेमके कुठे जमा करावेत याची माहिती या इमेलमध्ये नव्हती.

या चौकशी समितीचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन करत आहेत. त्यात माजी आयपीएस अधिकारी आलोक जोशी, संदीप ओबेरॉय हे सदस्य आहेत. त्या व्यतिरिक्त तंत्रज्ञान चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ज्या याचिकाकर्त्यांनी केली होती त्यामध्ये पत्रकार शशी कुमार, राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास, पिगॅसस स्पायवेअरचे पीडित पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता, एस.एन.एम. अब्दी व स्पायवेअरचे संभाव्य लक्ष्य असलेले पत्रकार प्रेम शंकर झा, रुपेश कुमार सिंग व कार्यकर्ते इप्सा शताक्षी आदी मान्यवर आहेत.

द वायरनुसार पिगॅसस हेरगिरी प्रकरणात देशातील ४० हून अधिक पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: